विद्याथ्र्यांच्या भविष्याशी खेळणाèयांवर कठोर कार्यवाही करा – पंकज रहांगडाले

0
12

गोंदिया – २५ मे रोजी १२ वीचा निकाल बोर्डाने जाहीर केले, मात्र गोरेगाव तालुक्यातील चिचगाव येथील विद्याभारती शिक्षण संस्थेद्वारे संचालित मनोहरभाई पटेल हाईस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वीत शिक्षण घेत असलेल्या १०७ विद्याथ्र्यांचे निकाल बोर्डाने जाहीर न करता थांबविले आहे. विद्याथ्र्यांच्या पालकांनी या प्रकरणाची माहिती घेतली असता महाविद्यालय प्रशासनाने परीक्षेची फी न भरल्याने सदर निकाल थांबविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या १२ वी नंतर पुढच्या शिक्षणाकरिता प्रवेशासाठी विद्यार्थांची धडपड सुरु आहे. अशात निकाल आले नाही तर विद्याथ्र्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. या चिंतेत विद्यार्थी व पालक आहेत. या मुळे प्रशासनाने त्वरित या प्रकरणी चौकशी करून विद्याथ्र्यांना न्याय मिळवून द्यावा व दोषींवर कठोर कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन आज ४ जून रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या नेतृत्वात जिल्हा भाजयुमोतर्फे जिल्हाधिकाèयांना देण्यात आले.  यावेळी जिल्हा महामंत्री ऋषिकांत साहू, पंकज सोनवाने, जिल्हा उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद ठाकरे, गोंदिया भाजयुमो शहर अध्यक्ष अजय लौगानी, अजित टेंभरे, विनोद बनसोडे, सचिन गोटेकर, अंकुश डोडानी, तनय बाचकवार, तसेच विद्यार्थी व पालक गेंदलाल रहांगडाले, हितेंद्र बिसेन, अंचल बिसेन, राहुल पारधी, नरेंद्र लांजेवार, संदीप पारधी, प्रतिक राहुलकर, झामसिंग बघेले, शुभम मेहरे, अनिकेत पारधी, ओमप्रकाश कटरे, रवींद्र चौधरी, गजानन रहांगडाले, मनीष ठाकरे, पुरुषोत्तम कोल्हे, सूरजलाल राहुलकर, वामन ठाकरे, माणिक बघेले आदी मोठ्या संख्येत पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.