कचकांदा खाल्ल्याने १६ मजुरांना विषबाधा

0
8


– चिरचाळी येथील मग्रारोहयोच्या कामावरील घटना
सडक अर्जुनी,दि.5 : जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योनेमार्फत चिरचाळी (डव्वा) येथे नाला सरळीकरणाचे काम सुरू आहे. या कामावर १०४ मजूर कार्यरत असून काही मजुरांनी जमिनीतील कांदा भाजून खाल्ल्याने १६ मजुरांना विषबाधा झाली. ही घटना काल ४ जून रोजी दुपारी १ वाजता दरम्यानची आहे. तत्काळ रुग्णवाहिका बोलावून १५ मजुरांना ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे दाखल करण्यात आले. तर एका मजुराला प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा येथे हलविण्यात आले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती चिंतेबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकाèयांनी सांगितले आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील चिरचाळी (डव्वा) येथे मग्रारोहयोअंतर्गत नाला सरळीकरण व संरक्षण qभतीचे काम सुरू आहे. या कामावर चिरचाळी येथील १०४ मजूर कार्यरत आहेत. काल ४ जून रोजी दुपारी १२ वाजता सुमारास काही मजुरांनी जमिनीतील कांदा काढून भाजून खाल्ल्याने काही वेळानंतर त्यांना विषबाधा झाली. लगेच १०८ रुग्णवाहिका बोलविण्यात आली. १५ महिला-पुरुषांना ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे तर एकाला प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा येथे हलविण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये पपिता भोजरात हुकरे (२४), लीला वामन गजभिये (४५), वनिता भास्कर गजभिये (२६), धृ्रपता बेनिराम मडावी (४५), कुसूम जानू मेंढे (४५), शांता शंकर मेश्राम (५२), राजेंद्र व्यंकट इळमते (३५), ज्ञानेश्वर बेनिराम मडावी (२२), हिराबाई देवचंद शिवणकर (४५), सेवंता सुरेश मडावी (५०), रेशमा रामचंद्र शेळमते (३५), मंगला जानू मेंढे (२३), विठा शालिकराम मडावी (५०) यांचा समावेश आहे. सर्व रुग्णांची प्रकृती qचतेबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकाèयांनी सांगितले. यासंदर्भातील माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेला देण्यात आली असून जिल्हा आरोग्य अधिकाèयामार्फत त्यांची चमू सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात दाखल होणार आहे. तसेच चमू कांद्याचे नमूने प्रादेशिक जीव वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकाèयांकडून सांगण्यात आले आहे.