चक्रीवादळामुळे पालांदूर – जमी. येथे २६ जनावरांचा मृत्यू

0
10
देवरी-निसर्गाच्या प्रकोपाने नको ते म्हणजे निसर्ग कधी काय करणार याचे काही नेम नाही. या मधलाच एक प्रकार म्हणजे देवरी तालुक्यातील पालांदूर-जमीदारी येथे ४ जून च्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास चक्रीवादळामुळे तब्बल २६ जनावरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सविस्तर असे की, ४ जून रोजी जनावर नेहमी प्रमाणे पालांदूर गावालगत इटियाडोह धरणाच्या पाण्याकडे जनावरे चराईला गेली असता पाणी पिण्यासाठी तलावात गेले असता. अचानक सायंकाळी चक्रीवादळ सुरू झाले व या वादळात तब्बल ५०-६० जनावरे अडकली त्यामध्ये काही जनावरे पाण्यात बुडाली तर काहीं ती त्या बेटातून बाहेर निघाली. रात्री पर्यंत हा प्रकार सुरू असल्याने कोणीही धरणाकडे गेले नाही व सर्व शेतकèयांना आपल्या जनावरांची qचता वाटू लागली. सदर प्रकार लक्षाते घेत सर्व जनावरांच्या शोधात पाण्याकडे गेली असता त्यांना सर्व जनावरे मृत अवस्थेत सापडली. घटनेची माहिती भाजपचे तालुका उपाध्यक्ष यशवंत गुरूनुले यांनी पशुसंवर्धन विभाग व पोलिस विभाग यांना कळविली. दोन्ही विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.   तालुका भाजयुमोचे तालुका महामंत्री कुलदीप लांजेवार व कृष्णदास चोपकर यांना कळताच आज सदर घटनास्थळी भेट दिली.  पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाèयांशी संपर्क साधून शासनाद्वारे शेतकèयांना आर्थिक मदत करून असे आश्वासन केले व येथील गावकèयांना नैसर्गिक आपत्ती, आकस्मिक आपत्ती यांच्या बचाव करण्यासाठी ‘पशु विमाङ्क संबंधीत मार्गदर्शन केले.