११ जूनला कर्करोग शिबिराचे आयोजन

0
14

गोंदिया, दि.६ : कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे ११ जून रोजी दुपारी १२.३० वाजेपासून ते ३ वाजेपर्यंत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिबिराचे आयोजन दंत विभाग ओपीडी परिसरात तपासणी करण्यात येईल. या शिबिरामध्ये तोंडाचे, घसाचे, स्तनाचे, गर्भाशय ग्रिवा इत्यादी कर्करोगाची निदान करण्यात येईल. निदान झाल्यानंतर राजीव गांधी योजनेअंतर्गत सदर रुग्णांचे उपचार गरज भासल्यास ऑपरेशन करण्यात येईल. या शिबिरात टाटा मेमोरियल येथील तज्ञ डॉक्टर कर्करोग तज्ञ डॉ.अमित जायस्वाल हे सेवा देणार आहेत. तरी जिल्ह्यातील गोरगरिब व गरजू लोकांनी या शिबिराचा लाभ घेण्याकरीता डॉ.मनिष बत्रा मो.९४२३४०७३२३, डॉ.योगेश पटले मो.९४०४३१७९८८, संजय बिसेन मो.७८७५११३९३९ यावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केले आहे.