दहावीच्या निकालात गोंदिया जिल्हा विभागात प्रथम

0
11

 

गोंदिया, दि. ६ :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या  वतीने इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला. गोंदिया जिल्ह्याने परंपरा कायम ठेवत नागपूर विभागात अव्वल येण्याचा मान ठेवला. जिल्ह्याचा निकाल ८८.२३ इतका लागला. २३ हजार ५६३ पैकी २० हजार ७९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात मुलींनी बाजी मारली असून त्याची टक्केवारी ९०.३८ एवढी आहे. अर्जुनी मोरगावची विद्यार्थीनी वैशाली गाडगिने हिने सर्वाधिक 97 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील ३०५ शाळामधील १२ हजार ९० मुले आणि ११ हजार ५२३ मुलींनी इयत्ता दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरले. त्यापैकी १२ हजार ५१ मुलांनी, तर ११ हजार ५१२ मुंलींनी परीक्षा दिली. त्यापैकी १० हजार ३८६ मुले आणि १० हजार ४०४ मुली असे एकूण २० हजार ७९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाèया मुलांची टक्केवारी ८६.१८ असून उत्तीर्ण मुलींची एकूण टक्केवारी ९०.३८ एवढी आहे. गोंदिया जिल्ह्यातील एकूण निकाल ८८.२३ एवढा आहे. गोंदिया तालुक्यातील ७ हजार ६६ विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली.य त्यापैकी ५९९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील उत्तीर्ण विद्याथ्र्यांची टक्केवारी ८४.८० एवढी आहे. आमगाव तालुक्यातील २४ शाळांमधून २ हजार ३८८ विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २ हजार १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ८८.८६ एवढी आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ४८ विद्यालयांतील २ हजार ७९५ विद्याथ्र्यांपैकी २ हजार ४९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील उत्तीर्णांची टक्केवारी ८९.२३ एवढी आहे. देवरी तालुक्यातील ३४ शाळां‘धील२ हजार १७९ पैकी दोन हजार दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्याथ्र्यांची टक्केवारी ९१.८८ आहे. गोरेगाव तालुक्यातील २८ शाळां‘धील २ हजार ४२२ विद्याथ्र्यांपैकी २ हजार ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. टक्केवारी ८५.२२ आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील २९ शाळां‘धील जोन हजार ३९ विद्याथ्र्यांपैकी १ हजार ८८७ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ९२.५५ आहे. सालेकसा तालुक्यातील १९ शाळांतील १ हजार ६१९ विद्याथ्र्यांपैकी १ हजार ४६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तिरोडा तालुक्यातील ३३ शाळांतील तीन हजार ५५ विद्याथ्र्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी २ हजार ७६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्याथ्र्याची टक्केवौरी ९०.३४ एवढी आहे.

कमी निकाल देणाèया शाळेचे नाव टक्केवारी

१) जेठाभाई माणिकलाल विद्यालय (मुख्य शाखा) गोंदिया ४७.७१

२) डॉ. आंबेडकर विद्यालय गोंदिया ५०.००

३) आझाद उर्दु हायस्कूल, गोंदिया ४५.४५

४) श्रीमती विमलताई विद्यालय गोंदिया ४६.७९

५)माताटोली नगर पालिका शाळा गोंदिया ५०.००

नवेगावांध- येथील  बी ए डी विध्या नवेगावबांधचा दहावीचा निकाल 100% विशेष बाब म्हनजे सदर विध्यालयाने 12वी चा निकाल सलग 3 वर्ष 100% दिला आहे यात विध्यार्थ्याची कठोर मेहनत ,सर्व शिक्षकाचे परिश्रम ,शालेय वातावरण व प्राचार्य आर आर मेंढे यांचे कुशल मार्गदर्शनामूळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रीया पालकवर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे .