शेतकर्‍यांना धनादेश वाटप

0
12

गोरेगाव- तालुक्यातील ग्रामपंचायत निंबा अंतर्गत येणार्‍या पठानटोला (निंबा) येथे १४ एप्रिलला आलेल्या चक्रीवादळ व अवकाळी पावसाने गावातील संपूर्ण शेतकर्‍यांच्या घरांची पडझड झाली होती.त्यांच्या दैनंदिनीच्या वस्तूंची नासाडी झाली होती. याचा मौका पंचनामा करून तलाठय़ाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे प्रकरण तहसील कार्यालय गोरेगाव येथे जमा केले होते. यावर तहसीलदारांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या नावे धनादेश् मंजूर केले.यात एकूण ६६ शेतकर्‍यांना धनादेशाचे ६ जून रोजी वाटप पं.स. सभापती दिलीप चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य ज्योती वालदे, निंबाचे उपसरपंच पुरूषोत्तम कटरे, तेढाचे सरपंच रत्नकला भेंडारकर, बुधराम बिजेवार, ग्रामसेवक ए.बी. जांभूळकर उपस्थित होते.