गोंदिया मेड़ीकल काॅलेजला एमसीआयची मंजुरी

0
11

गोंदिया-भारतीय वैद्यक परिषदेने अखेर गोंदिया येथील शासकीय मेडीकल काॅलेजला या शैक्षणिक वर्षापासून मंजुरी 6 जून रोजी दिली आहे.त्याबाबतचा प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या दक्षता समितीकडे सादर करण्यात आला आहे.विशेष म्हणजे 5 जून रोजी माजी खासदार प्रफुल पटेल यांनी मेडीकल काॅलेज संदर्भात दिल्लीत जाऊनयावर्षी सुरु करण्याबाबतची भूमिका गोंदियात मांडली होती.त्याची दखलही एमसीआयने लगेच घेतल्याचे दिसून आले.विशेष म्हणजे दक्षता समितीच्या मान्यतेनंतर केंद्र सरकार मंजुरी देणार असल्याची माहिती मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर करण्यात आली आहे.मेडीकल काॅलेजसदर्भात सुरु असलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करतांना न्या.भुषण गवई व न्या.विनय देशपांडे यांनी एमसीआयला परवानगी देण्याबाबत नोटीस बजावली होती.त्यावर गुरुवारी सुनावणी झाली असता त्यावेळी गोंदियाच्या काॅलेजला नकारात्मक शिफारस करण्यात आल्याची माहिती राज्यसरकारतर्फे सादर करण्यात आली.त्यावर एमसीआयला विचारणा करण्यात आली असता एमसीआयच्या वकिलांनी माहीती नसल्याचे नमुद केले.त्यावर खंडपीठाने ताशेरे ओढून दुपारपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते.तेव्हा एमसीआयच्यावतीने एॅड.राहुल भोंगाडे यांनी गोंदिया येथील मेडीकल काॅलेजला 6 जून रोजीच मान्यता देण्यात आल्याची माहिती सादर केली.