शिक्षक बदल्याना घेऊन आ.रहागंडालेंची सीईओसोबत चर्चा

0
6

शिक्षक संघ व समितीच्या पदाधिकायानी घेतली जि.प.उपाध्यक्ष,शिक्षणाधिकारी यांची भेट

गोंदिया,दि.10- गोंदिया जिल्हापरिषदेसह भंडारा जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांना ग्रामविकास मंत्रालयाने स्थगिती दिली आहे.त्या स्थगिती निर्णयामुळे शिक्षकामध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करतांना शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत आणि नियमबाह्य पध्दतीने हुकूमशाह स्वरुपात बदल्या केल्याचा आरोप आहे.वास्तविक प्रशासकीय बदल्या जेवढ्या करायच्या तेवढ्याच रिक्त जागा या बोर्डावर दाखवायला हवे होते.परंतु शिक्षणाधिकारी नरड यांनी 338 जागा पहिल्या शिक्षकाला न दाखविता सुरवातीच्या दोन ते तीन शाळाच दाखवायचे.जेव्हा प्रशासकीय 10 टक्के बदल्या करण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा 53 वर्ष ज्यांची झाली त्यांनाच वगळायचे होते परंतु काही अधिक नावे शिक्षण विभागाने वगळली होती.सोबतच त्यांनी शाळांची नावे पुर्ण न दाखविता मोजकेच दाखविण्याचा प्रयोग केल्याने त्याच ठिकाणी पाIMG-20160610-WA0138णी मुरत असल्याचे लक्षात आले.शिक्षणाधिकारी यांना नियमाने बदल्या करण्याची विनंती दोन्ही शिक्षक संघटानानी केली होती .परंतु स्वतची हुशारकी दाखविण्याच्या नादात ज्यांच्यावर हृद्यशस्त्रक्रिया झाली त्यांचीही बदली शिक्षणाधिकारी यांनी केल्याचे प्रकरण सीईओ समोरच उघड झाले होते.तर महिला शिक्षकांना चिपोटा सारख्या दुर व लांबच्या ठिकाणी पाठवणे.पती पत्नी एकत्रीकरणाच्या नावावर पत्नी सडक अर्जुनी तालुक्यात तर पती देवरी तालुक्यात अशाप्रकारचा गोंधळ या प्रकियेत करुन अन्याय करण्यात आल्यानेच आम्ही याप्रकरणाची तक्रार ग्रामविकास मंत्री यांना केली.त्यासंबधीचे निवेदन आमदार विजय रहागंडाले यांना दिले.

आणि आमदार रहागंडाले यांना झालेल्या चुकीची माहिती दिल्यानंतर त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकंजा मुंडे यांच्याशी चर्चा करुन गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या झालेल्या बदल्यातील अनियमितता उघडकीस आणून दिल्यानंतर
या बदल्यांना स्थगिती देण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्र्यांनी घेतला.त्यामुळेच 9 जून रोजी ग्रामविकास मंत्रालयाचे कक्ष अधिकारी यांनी आमदार विजय रहागंडाले यांच्या पत्राचा उल्लेख करीत या प्रक्रियेचे चौकशी होईपर्यत बदली प्रकिया स्थगीत करण्यात येत असल्याचे म्हटले.त्यानुसार आज शुक्रवारला आ.रहागंडाले यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ डाॅ.चंद्रकात पुलकुंडवार,शिक्षणाधिकारी उल्हास नरड,जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या समस्यांची जाणिीव करुन दिली.यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष नुतन बांगरे,जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे,प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षित,एल.यु.खोब्रागडे,अयुब खान,गणेश चुटे,शंकर चव्हाण.यु.पी.पारधी,अनिरुध्द मेश्राम यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते.

त्यांनतर आमदार रहागंडाले यांनी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन प्राथमिक शिक्षक संघाच्या सदस्यांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांना प्रशासनासोबत आपण शिक्षकांसोबत  असल्याचे आश्वासन दिले.कुणावरही अन्याय होणार नाही.पारदर्शक पध्दतीने बदली प्रकिया करण्यासंबधी आपण सीईओ यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले.यावेळी त्यांच्यासोबत तिरोडा बाजार समितीचे प्रशासक चितांमण रहागडाले,भाजप युवा मोर्चा अद्यक्ष पंकज रहागंडाले आदी मान्यवर उपस्थित होते.