ध्वजारोहण करुन राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवस साजरा

0
7

गोंदिया,दि.10: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाप्रसंगी आज शुक्रवार (दि.१0) सकाळी १0 वाजता आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते पक्षाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली येथे ध्वजारोहण करुन पक्षाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.यावेळी आ.जैन यांनी पक्षाच्या विस्तारासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकत्यार्नी सक्रीय राहून येत्या निवडणुकीत पक्षाला यश कसे मिळेल यासाठी आजपासून कामाला लागण्याची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रीय नेते खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या मार्गदर्शनात पक्षाला यापुढेही मजबुत करण्याचे काम करावे असे आवाहन केले. 
अध्यक्षस्थानी जिल्हा राकाँ अध्यक्ष विनोद हरिणखेडे होते.यावेळी शिव शर्मा, राजलकक्ष्मी तुरकर,गंगाधर परशुरामकर,मनोहर वालदे,जितेश टेंभरे,केतन तुरकर, राजकुमार जैन,अशोक शहारे,देवेद्र चौबे,मोहनलाल पटरे,राजेश तुरकर,प्रेम रहागंडाले,रवि मुदंडा आदी तसेच सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व घटकांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगर परिषद सदस्य, नगर पंचायतचे सदस्य, जिल्हा परिषदेदचे सदस्य व पंचायत समितीचे सदस्य, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महिला राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी सेवा दल काँग्रेस, ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) सेल, मागासवर्गीय सेल व सर्व घटक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.