सीईओचा विश्वासघात करुन कॅपो गेले रजेवर

0
12

गोंदिया,दि.10-गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये गेल्या महिन्यात विविध विभागाच्या प्रशासकीय बदल्या पार पडल्या.यामध्ये वित्त विभागात सहा. लेखाधिकारी या पदावर पंधरे कार्यरत होते.त्याच्याकडे लेखाधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला होता.त्यानंतर मे महिन्यात झालेल्या प्रशासकीय बदलीमध्ये पंधरे यांची गोरेगाव पंचायत समितीमध्ये बदली करण्यात आली.त्यांना वित्त विभागाने 31 मे रोजी कार्यमुक्त केले.त्या दरम्यान कार्यमुक्तीचा फाईलसह इतर काही फाईल मुख्य कार्याकारी अधिकारी यांच्याकडे वित्त विभागाने नेल्या असाव्यात त्या दरम्यान 2 जून रोजी पंधरे यांना परत वित्त विभागात प्रतिनियुक्ती देण्यात यावी यासंबधीची फाईलवर स्वाक्षरी घेतांना मुकाअ डाॅ.पुलकुंडवार यांना स्पष्ट माहिती न देता त्यांना अंधारात ठेवून त्यांची स्वाक्षरी घेण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे.जेव्हा की प्रतिनियुक्तीची फाईल ही जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागामार्पेत जायला हवी होती.परंतु जि.प.सामान्य प्रशासन विभागाकडून अशी कुठलीच फाईल आपल्या विभागाकडे आली नसल्याची माहिती या विभागाचे वरिष्ठ सहाय्यक श्री दे्साई यांनी बेरार टाईम्सने विचारणा केली असता दिली.प्रतिनियुक्तीचे पत्र नसतानाही पंधरे यांनी गोरेगाव पंचायत समितीला रुजु झाल्यानंतर परत वित्त विभागात येऊन काम सुरु केले.यासंबधीची बातमी बेरार टाईम्स न्युजपोर्टलने सर्वात आधी दिली होती.त्यावेळी सुध्दा मुकाअ डाॅ.पुलकुंडवार यांना भ्रमणध्वनी करुन विचारणा केली असता आपण अशी कुठल्याच फाईलवर स्वाक्षरी केली नसल्याची माहिती दिली.त्यानंतरही वित्त विभागात पंधरे यांनी काम कसे केले आणि कॅपा चव्हाण यांनी त्यांना स्वाक्षरी करुन काम कसे करु दिले हा प्रश्न उपस्थित झालेला आहे.याअ्र्थी कॅपो यांनी मुकाअ पुलकुंडवार यांना अंधारात ठेवत त्यांचा विश्वासघात करीत पंधरे यांना वित्त विभागात कायम ठेवण्यासाठी केलेला हा प्रकार प्रशासकीय यंत्रणेला न शोभणारा ठरला आहे.4 मे रोजी वित्त विभागाच्या मस्टरवर स्वाक्षरी करुन पंधरे यांच्या स्वाक्षरीने बिल सुध्दा निघालेले आहेत.जेव्हा की त्यांची बदली झालेली असून ते त्या विभागातून कार्यमुक्त सुध्दा झालेले असताना ते बिल कसे निघाले हा प्रश्न उपस्थित झाला आहे.त्यानी बिल पास करुन नमुना 12 वर सुध्दा चढविले त्यावर कॅपो चव्हाण यांनी सुध्दा स्वाक्षरी केलेली आहे.या सर्व प्रकाराचा कुठेतरी खुलासाच नव्हे तर उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेची झाली आहे.

या सर्व प्रकरणाकडे मुकाअ डाॅ पुलकुंडवार कशापध्दतीने बघतात आणि काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार रजेवर गेलेले कॅपो चव्हाण यांनी आज वित्त विभागात भ्रमणध्वनी करुन पंधरे यांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश काढम्यासबंधीचे निर्देश दिल्याची चर्चा आहे.