पालकमंत्री बडोले यांचा दौरा कार्यक्रम

0
12

गोंदिया,दि.१२ : पालकमंत्री राजकुमार बडोले हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. १३ जून रोजी सकाळी ११.३० वाजता सडक/अर्जुनी येथून मोटारीने गोंदियाकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन. दुपारी १२.१५ वाजता गोंदिया जिल्ह्यातील विविध योजनांसंबंधी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांसोबत बैठक. दुपारी १ वाजता पीक कर्ज विमा योजनेबाबत बैठक. दुपारी २ वाजता गोंदिया व तिरोडा नगरपरिषद दलीत वस्ती कामाची आढावा बैठक. दुपारी ३ वाजता २ कोटी वृक्ष लागवड व संगोपन योजनेबाबत बैठक घेतील व दुपारी ३.३० वाजता गोंदिया येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.