वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रफुल पटेलांचा पुढाकार

0
9

गोंदिया- येथील वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळवून देण्यासाठी दिल्ली व मुंबईच्या शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करणारे तसेच भारतीय वैद्यकीय परिषदेच्या सदस्यांना गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची जाणिव करून देऊन मंजुरी मिळविण्यात महत्वाची भूमिका बजावल्या बद्दल खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रपुâल पटेल यांचे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्र्यांनी व जनतेनी अभिनंदन केले आहे.
वेंâद्रात आणि राज्यात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना तत्कालीन वॅâबिनेट मंत्री तथा खासदार प्रपुâल पटेल यांनी ३० मार्च २०१२ रोजी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील आमदारांना घेऊन मुंबई येथे राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याची मागणी केली होती. वारंवार पाठपुरावा करून वेंâद्र व राज्य सरकारकडून गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. एवढेच नाही तर राज्यात मंजुर झालेल्या सहा वैद्यकीय महाविद्यालयापैकी केवळ गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी वेंâद्र शासनाकडून १५० कोटी रुपये मंजूर करवून घेतले. सोबतच गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाला परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी सुद्धा केली होती. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता व तसे नामाफलकाचे १४ एप्रिल २०१६ रोजी खासदार प्रपुâल पटेल यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेले आहे.
गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देण्याच्या संदर्भात भारतीय वैद्यकीय परिषदेने गोंदियाला भेट देऊन पाहणी केली होती. या संदर्भात खा. प्रपुâल पटेल यांनी तात्काळ भारतीय वैद्यकीय परिषदेच्या सदस्यांची भेट घेऊन गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी संपूर्ण सुविधा उपलब्ध असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयासाठी १५० कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले. प्रपुâल पटेल यांच्या प्रभावी चर्चेनंतर भारतीय वैद्यकीय परिषदेने गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी प्रदान केली असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. परिसरातील विद्याथ्र्यांना वैद्यकीय शिक्षणाची सोय जिल्ह्यात उपलब्ध व्हावी असे खा.प्रपुâल पटेल यांचे स्वप्न होते. या वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्न करणार तसेच या वैद्यकीय महाविद्यालयातून आपल्या भागातील विद्याथ्र्यांना वैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या विकासासाठी निरंतर त्यांच्या पाठिशी राहणार असल्याचेही पटेल यांनी म्हटले आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणाNया विद्याथ्र्यांना प्रपुâल पटेल यांनी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.
गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे खासदार प्रपुâल पटेल यांचे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाNयांनी व जिल्ह्यातील जनतेने अभिनंदन केले आहे.