वैद्यकीय महाविद्यालय एकाचे नव्हे सर्वांचे क्रेडीट – खा.पटोले

0
5

गोंदिया,दि.16-गोंदिया मेडीकल कॉलेज संदर्भात बोलतांना खासदार नाना पटोले म्हणाले की, मेडिकल कॉलेजला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. कॉलेजला एमसीआयची मंजुरी मिळण्यासाठी लागणाNया सुविधा पूर्ण करण्यासाठी मी खासदार झाल्यानंतर जमीन खरेदी करण्यापासून पुढील प्रक्रिया सुरू झाली. मधल्या काळात कॉलेजसाठी लागणाNया बेसिक गोष्टी तयार करण्याकडे कोणी लक्ष दिले नाही. मात्र क्रेडिट घेण्यासाठी पुढे येत आहेत. हे कोणाचे एकाचे क्रेडिट नसून सर्वांचेच क्रेडिट असल्याचे ते म्हणाले.प्रस्तावित गोंदिया मेडिकल कॉलेजसाठी राज्य शासनाने १०० जागा मंजूर केल्या आहेत. उच्च न्यायालयानेही कॉलेज सुरू करण्यासंदर्भात अनुकूल मतप्रदर्शन केले आहे. त्यासंदर्भात येत्या १६ जूनला अंतिम सुनावणीही आहे. मात्र हे कॉलेज एमसीआयच्या परवानगीशिवाय सुरू होणार नाही, असे सांगून कोणी राजकीय लोकांनी एकट्याने हे क्रेडिट घेऊ नये, असा टोला खासदार नाना पटोले यांनी लावला.
गोंदियातील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या जागा अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्याकडे खा.पटोले यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ही परीस्थिती केवळ गोंदियाच नाही तर संपूर्ण देशभर आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांचे सभागृहात लक्ष वेधले होते. मात्र आरोग्यमंत्र्यांनी त्या मुद्याला बगल दिली. ही परिस्थिती बदलण्यासाठी सिस्टीममध्येच बदल करावा लागेल, असे खा.पटोले म्हणाले.