जिल्ह्यात सरासरी १२.७ मि.मी.पाऊस

0
9

वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

गोंदिया, दि.१८ : पावसाळ्याचे दिवस जवळ आले असतांना देखील वरुणराजा बरसण्याची प्रत्येकाला प्रतिक्षा होती. काल झालेल्या वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा देखील सुखावला असून सर्वांनाच त्याने दिलासा दिला आहे.
जिल्ह्यात १ ते १८ जून २०१६ या कालावधीत ८३४.५ मि.मी. पाऊस पडला असून त्यांची सरासरी २५.३ मि.मी. इतकी आहे. आज १८ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४१७.९ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी १२.७ मि.मी. इतकी आहे.
१८ जून रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- ६५.३ मि.मी. (९.३ मि.मी.), गोरेगाव तालुका- ५५.५ मि.मी. (१८.५), तिरोडा तालुका- २५.९ मि.मी. (५.२), अर्जुनी मोरगाव तालुका- ७०.८ मि.मी. (१४.१), देवरी तालुका- १७ मि.मी. (५.६), आमगाव तालुका- ४८.४ मि.मी. (१२.१), सालेकसा तालुका- ७४.४ मि.मी. (२४.८) आणि सडक अर्जुनी तालुका- ६०.६ मि.मी. (२०.६) असा एकूण ४१७.९ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी १२.७ मि.मी. इतकी आहे.