सलेअ पंधरे फक्त तीन दिवस करणार गोरेगावात काम सीईओचे आदेश

0
15

सीईओ साहेब बेरार टाईम्ससोबत बोलले खोटे
गोरेगाव पंचायत समितीला म्हणे कामच नाही
गोरेगावचे पदाधिकारी मूग गिळून गप्प

गोंदिया,दि.१८-गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये शासनाच्या ग्रामविकास मंत्रालय व सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार प्रशासकीय बदली प्रकिया पार पडली.त्यानुसार गोंदिया जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात कार्यरत आणि गेल्या अनेक वर्षापासून याच विभागात राहिलेले सहाय्यक लेखाधिकारी यु.जे.पंधरे यांची गोरेगाव पंचायत समितीमध्ये सहाय्यक लेखाधिकारी या पदावर प्रशासकीय बदली ३१ मे रोजी करण्यात आली.त्यानुसार ते तिथे रुजु ही झाले.परंतु कुठल्याही कर्माचाèयाला प्रतिनियुक्तीवर जर आणायचे असेल तर त्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने त्याप्रकारची फाईल सादर केली जाते जी विभागीय आयुक्त यांच्या स्वाक्षरीने मंजुर होते.परंतु अशी कुठलीच प्रकिया न करता वित्त विभागाचे सलेअ पंधरे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी २ जून रोजीच स्वाक्षरी करुन त्यांना गोरेगाव पंचायत समितीमध्ये सोमवार,मंगळवार व बुधवार असे दिवस ठरवून उर्वरित दिवसी ते वित्त विभाग जि.प.गोंदिया येथे कार्य करतील अशा आदेश पत्रावर स्वाक्षरी करुन त्यांना परत वित्त विभागात आणण्यास मंजुरी दिली आहे.यासंबधीचे जे आदेश निघाले ते जाक्र./जिपगो/अर्थ/आस्था/डे-७/१५५२/२०१६ यानुसार वित्त विभागातून यावरुन सामान्य प्रशासन विभागाला वित्त विभागाचे मुख्य अधिकारी जे कुणी राहिले असतील त्यांना डावलत ही प्रकिया पार पडली असे म्हणण्यास काहीच हरकत राहीलेली नाही.या आदेशात मा.मु.का.अ.जि.प.गोंदिया यांचे आदेश क्रमांक /जिपगो /वित्त /आस्था/ बदली /१३६८/२०१६ दि.१२ मे २०१६ व गटविकास अधिकारी प.स.गोरेगाव यांचे पत्र जाक्र./पसंगो /आस्था/ रुअ /वस /डे-३ /१५५९,२ जून २०१६ चा उल्लेख करण्यात आला आहे.त्यानुसार पंधरे हे गोरेगाव पं.स.मध्ये रुजु झालेले आहेत.त्याअर्थी त्या पदावर राहून तेथील कार्यालयीन कामे सांभाळून गोंदिया जि.प.येथील वित्त विभागात सहा.लेखाधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार पुढील आदेशापर्यंत सांभाळतील असा उल्लेख करण्यात आला आहे.गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये सहाय्यक लेखाधिकारी पदावर कार्यरत अनेक कर्मचारी आहेत.त्यांना मुख्यालयातच प्रभार सोपविला जाऊ शकत होता,परंतु असे का करण्यात आले नाही याचा पारदर्शक सीईओ यांनी शोध घेतला नाही.विशेष म्हणजे जेव्हा बेरार टाईम्सने सीईओ डॉ.ंचद्रंकात पुलकुंडवार यांना विचारणा केली असता त्यांनी आपण अशा कुठल्याच पत्रावर स्वाक्षरी केली नसल्याचे म्हटले होते.मग या आदेशावर असलेली सीईओची स्वाक्षरी कुणाची की ही बोगस स्वाक्षरी आहे याचाच शोध घेण्याची वेळ आली आहे.वित्त विभागाचे काम पंधरे हेच सांभाळू शकतात इतर सलेअ का नाही हा सुध्दा संशोधनाचा विषय झाला असून पंधरे यांची प्रशासकी बदली झाल्याने त्या रिक्त जागेला भरण्याचे काम वित्त विभागाने व सामान्य प्रशासन विभागाने का केले नाही याचा तपास विभागीय आयुक्तांनी चौकशीमार्फेत करुन दोषीवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.