धानाच्या चुका-यासाठी माजी खा.शिशुपाल पटलेंच्या शिष्टमंडळाने घेतली सरव्यवस्थापकाची भेट

0
8

आठवडाभरात शेतकर-यांच्या खात्यात चुकारे होणार जमा
४० धान खरेदी संस्था मधील शेतकऱ्यांचे रु.५० कोटी अडले होते
भंडारा- आधारभुत किंमत धान खरेदी केंद्रावर मागील दोन महिन्यापासून शेतकऱ्यांनी धान विक्री केली.राज्य सरकारकडून सदर शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे जिल्हा पणन अधिकारी भंडारा यांना प्राप्त झाले.परंतू आज तागायत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात महाराष्ट्र राज्य पणन विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे जिल्हयातील ४० धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणा-या शेतकऱ्यांचे ५० कोटी रुपये जमा होवू शकले नव्हते. मार्च महिन्यात सर्व शेतकऱ्यांना घेतलेले कर्ज परत करावयाचे असते.मार्च महिना अखेरपर्यंत चुकारे खात्यात जमा होतील याची शाश्वती दिसत नव्हती.
त्यामुळे शेतकऱ्यांनी व धान खरेदी संस्थांनी सदर अडचण माजी खासदार मा.शिशुपाल पटले यांचेकडे सांगितली.पणन विभागाचे राज्याचे सरव्यवस्थापक श्री.भोकरे व नेरकर हे भंडारा येथे आले असल्याचे कळताच माजी खासदार शिशुपाल पटले यांचे नेत्रूत्वातिल एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.जिल्हा पणन अधिकारी श्री.सुधीर पाटील हे सुध्दा उपस्थित होते.जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत त्यांना अवगत केले.आपल्या विशिष्ट शैलीने आपल्या मागण्या मंजूर करून घेतल्या. त्यामुळे जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी माजी खासदार शिशुपाल पटले व त्यांचे शिष्टमंडळाचे आभार मानले आहे.शिष्टमंडळात किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डाॅ.हरेंद्र राहांगडाले,नेपाल रंगारी,अनिल टेकाम,प्रमोद कटरे,प्रदीप बंधाटे,प्रशांत माटे,सुनील गिर्हीपुंजे,चंद्रप्रकाश माकडे, रंजीत बुध्दे,अतुल दहीवडे,सुशिल डोंगरवार, शुभम समरीत,महेंद्र बिंजेवार, प्रशांत माटे, लोकेश्वर पटले, कामरान खान, विकास कापगते, ज्ञानेश्वर बावनकुळे, जगदिश वैद्य, रामकृष्ण गायधने, रामदास राघोर्ते, प्रदीप बुराडे, संदीप मेश्राम, ओमप्रकाश फुंडे, चेतन कापगते, प्रवीण कहालकर, दिपक बुराडे उपस्थित होते.