गोंदियात डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमाला पत्रकार उर्मिलेश आणि प्रा. आवाड येणार

0
11

अरविंद माळी यांचं कॅडर कॅम्प

गोंदिया ता.21 मार्च :-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 133 व्या जयंतीसाठी गोंदियात जय्यत तय्यारी सुरु झाली आहे.पुढील महिन्यात तारीख 14 आणि 15 एप्रिल रोजी आयोजित या दोन दिवशीय कार्यक्रमा दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दरम्यान 14 एप्रिल रोजी आयोजित मुख्य कार्यक्रमात राज्यसभा TV चे माजी कार्यकारी निदेशक आणि पत्रकार उर्मिलेश तसेच जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीचे प्रा. मिलिंद आवाड मुख्यवक्ता म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जी. एल. तिरपुडे यांनी दिलेल्या माहिती नुसार जयंतीच्या कार्यक्रमासाठी कार्यकर्ते कामाला लागले असून हा कार्यक्रम नगरपरिषद सुभाष शाळेच्या पटांगनावर होणार आहे.13 एप्रिलच्या मध्यरात्री फटाक्याच्या लड्या फोडून अतिशबाजी करण्यात येईल. त्यांनतर सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून जयंतीच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. शहरातील प्रत्येक भागातून रॅली काढण्यात येणार असून फुले आंबेडकरी विचारधारेवर देखाव्यांचे प्रदर्शन घडविण्यात येणार आहे.याप्रसंगी विविध समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल. बालाघाट येथील प्रकाश सागर द्वारा प्रस्तुत भीमगीतांची मैफल,पत्रकार उर्मिलेश आणि प्रा. आवाड या मुख्य वक्त्यांचे प्रबोधन होणार आहे. दुसऱ्या दिवशी ता.15 रोजी विद्यार्थ्यांची गुणवत्ता परीक्षा, प्रसिद्ध विचारवंत अरविंद माळी यांचे कॅडर कॅम्प, बुद्धिमान अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन परीक्षेचे मार्गदर्शन होणार असून रात्री मनोरंजनपर कार्यक्रमांतर्गत पुणे येथील प्रसिद्ध गायक संकल्प गोरे यांचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती समितीचे अध्यक्ष जी. एल. तिरपुडे, उपाध्यक्ष अरविंद भावे, कोकिळा राहुलकर,कार्याध्यक्ष मनोज मेंढे,कार्यकर्ते स्वाती वालदे, मच्छिन्द्र भेलावे,स्विटी वैद्य,निरंजन डहाट, मनिषा गजभिये, आम्रपाली वनकर, ऍड अंजली चौरे, माया नागदीवे, निशा. मेश्राम, शायना पठाण, पृथ्वीराज कोल्हटकर आणि सिद्धार्थ रामटेके यांनी केले आहे.