आत्मसमर्पीत माओवाद्याने मांडली व्यथा : पोलिसी जाचाने जिंदगीच नासली

0
9

खोट्या आरोपांखाली गोवण्याचा प्रयत्न

गोंदिया, : शेती कसणे आणि कुटुंबाचे पालनपोषण करत असताना १९९० साली देवरी पोलिसांनी खोटे गुन्हे नोंदवून माओवादी असल्याचे घोषित केले. एकीकडे पोलिसांच्या दंडुक्याचा त्रास; तर दुसरीकडे माओवाद्यांचीही भिती होती. अखेर माओवाद्यांचा शामील झालो. १९९६ साली आत्मसमर्पण केले. त्यानंतर १० वर्ष नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगली. न्यायालयाने सर्व गुन्ह्यांतून मुक्तता केली. असे असताना देखील आता मध्यप्रदेशातील बहेला आणि लांजी येथील पोलिस मला कधीही उचलून नेत आहेत. या जाचापेक्षा आता पुन्हा माओवादाकडेच वळावे काय? असा सवाल आत्मसमर्पित माओवादी मोहन बिरजू पंधरे यांनी उपस्थित केला.
येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांना माहिती देताना ते आज(ता.२०) बोलत होते. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका जंगलव्याप्त आणि नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग. या भागात रांजनडोंगरी हे गाव आहे. या गावातील मोहन बिरजू कुंभरे हा आदिवासी व्यक्ती उदरनिर्वाहाकरिता शेती करत होता. दरम्यान १९९० मध्ये देवरी तालुकामुख्यालयी शेतकèयांचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी चेंगराचेंगरी झाल्याने कायदा व्यवस्था बिघडली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अनेकांवर गुन्हे नोंदविले. आपण मोर्चात गेलो नसताना आपले नाव दंगल करणाèयांमध्ये घातले गेले. ज्यांना-ज्यांना पोलिसांनी पकडून नेले, त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांच्या माराच्या भितीने मी दिवसा जंगलात, तर रात्री घरी येत असे, अशी माहिती मोहन कुंभरे यांनी दिली. पोलिसांच्या भितीने चक्क तीन वर्ष असेच जंगलात काढले. याच दरम्यान माओवाद्यांशी संपर्क आला. पोलिसांच्या दडपशाहीत जगण्यापेक्षा नक्षल चळवळीत सहभागी झालो. त्यानंतर १९९६ साली देवरी पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण केले. न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर देवरी येथील ग्रामूीण रुग्णालयाशेजारी दुकान थाटले. पोलिस ठाण्याच्या जवळच वास्तव्याला होतो. तीन वर्षापूर्वी शेतात असताना काही पोलिस आले. पोलिस अधिक्षकांनी बोलावले असे सांगून मध्यप्रदेशातील बहेला येथे घेवून गेले. तिथे अटक केली. तीन महिन्यांचा कारावास झाला. त्यानंतर पुन्हा घरी येवून काम करू लागलो. २२ मे २०१६ रोजी सायंकाळी बोरगाव येथे गोंड धर्मीय सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयाकरिता गेलो असता काही मध्यप्रदेशातल लांजी पोलिस ठाण्याचे पोलिस माझ्या घरी आले. त्यांनी घराची झडती घेतली. माझ्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला. मी पोलिसांसी चर्चा केली. दरम्यान त्यांनी देवरी पोलिस ठाण्यात चाल, असे सांगून चारचाकी वाहनात कोंबून थेट लांजी येथे नेले. तिथेही तुरुंगात डांबण्यात आले. मी आत्मसमर्पीत माओवादी आहे. न्यायालयाने निर्दोष सुटका केली. असे असताना वारंवार पोलिस मला आणि माझ्या घरच्या मंडळींना त्रास देत आहेत. अशी qजिदगी जगण्यापेक्षा आता पुन्हा माओवादाकडेच वळावे काय? असा सवाल मोहन कुंभरे यांनी उपस्थित केला. पोलिसांनी छळ थांबवावा, अन्यथा आदिवासी समाजातङ्र्के आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा रामेश्वर कुमोटे यांनी दिला. यावेळी त्यांच्यासह शालू पंधरे, अनिता पाऊलझगडे, पत्नी धृपता कुंभरे, भोजराज चौधरी, सुखरा‘ दुर्गे, पंढरी उईके, गेंदलाल वर्चो आदी उपस्थित होते.

यासंदर्भात लांजी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी वरखडे यांच्याशी संपर्क केला असता त्याला पकडून आणण्याकरिता मी सुद्धा गेलो होतो. मात्र, पुढील माहितीकरिता वरिष्ठांशी संपर्क करा असे त्यांनी सांगीतले.त्यावर लांजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेश पटेल यांना दुरध्वनीवर विचारण्यात आली असता त्यांनी कुंभरे ने महाराष्ठ्रात जरी आत्मसमर्पण केले असले तरी जुन्या प्रकरणात त्याचावर गुन्हे दाखल होते.त्या गुन्ह्यात कोर्टाकडून समन्स निघायचे परंतु हजर राहत नसल्याने कोर्टाने दिलेला अटक वारंट नुसार त्याला पकडण्यात आल्याचे बेरार टाईम्सला सांगितले.