घोटाळ्यात लोकल आडॅीटरसह निरिक्षण पथकाची भूमिकाही संशायस्पद

0
26

गोंदिया- सडक अर्जुनी पंचायत समितीमध्ये शिक्षकांच्या एलआयसी व जीपीएफ सह शालेय पोषण आहाराची रक्कम गैरमार्गाने आपल्या खात्यात वळती करणारा मुख्य आरोपी हा जामीन घेऊन बाहेर फिरत आहे.यातही विशेष म्हणजे ज्या आर्थिक वर्षामध्ये हा गैरप्रकार झाला त्या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षणही करण्यात आले आहे.वार्षिक लेखापरिक्षणासाठी जि.प.सीईओचे निरिक्षण पथक आधी जाते.त्यानंतर लोकल ऑडिटर तपासणी करते यांच्यानंतर नागपूर येथील ऑडीटर जनरलची चमू आर्थिक व्यवहाराची तपासणी करते.२०१२ पासून हा प्रकार जर सुरु असेल तर या तीन्ही तपासणी समित्यांना हा गैरप्रकार दिसून कसा आला नाही,हे संशोधनाचे ठरले आहे.त्या तपासणी समित्यांनी याचा अर्थ आर्थिक व्यवहाराची तपासणी योग्यरित्या केली नाही हे याप्रकरणावरुन स्पष्ट होत असल्याने शासनाने आत्तापर्यंत जे कुणी या पंचायत समितीमध्ये लेखापरिक्षणासाठी गेले असतील त्यांचीही चौकशी करायला हवी.तपासणी समिती ही निव्वळ दारुपाणी आणि मटन खाण्यातच अशीही व्यस्त असल्याचे अनेक प्रकार गोंदिया मुख्यालयी अनेकदा बघावयास मिळाले आहे,तसाच प्रकार सडक अर्जुनीत होऊन या गैरव्यवहारावर पांघरुन घालण्याचे काम झाले असावे अशी चर्चा आहे.यातच मुख्य आरोपी असलेला सुनिल पटले याला जी अग्रीम जमानत मिळालेली आहे,त्याचीही मुदत एक दोन दिवसात संपत असल्याने पोलीसांच्या हाती पटले लागल्यानंतर पटले तपासादरम्यान अजून कुणाकुणाचे नाव सांगतो याकडे लक्ष लागले आहे.सुत्रानुसार पटलेला संगणक चालविता येत नाही.संगणकाद्वारे बिल तयार करण्यात आल्याने संगणक चालकही या प्रकरणात अडकण्याची शक्यता असून एसबीआय या बँकेचीही तपासणी होऊ शकते अशी चर्चा सुरु आहे.
गोंदिया येथे असलेल्या स्थानिक लेखा परीक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचाèयांनी या पंचायत समितीमध्येही लेखापरीक्षण केलेच असावे.जर त्यांना लेखा परिक्षणाच्यावेळी सदर रक्कम शिक्षकांच्या खात्यात न जाता वैयक्तिक खात्यात जमा झाल्याचे दिसून आले नाही का याचा तपास सुद्धा पोलिस यंत्रणेने घ्यायला हवे.जे लोकल ऑडिटर दोनशे व तीनशे रुपयाचा एखादा बिल नसेल qकवा त्याचा उल्लेख नसेल तर त्यावर आक्षेप नोंदवितात.त्या ऑडिटरला बँकेचे कॅशबुक आणि चेकबुक तपासताना सडक अर्जुनी पंचायत समितीच्या आर्थिक व्यवहारात चूक दिसून आली नाही या गोष्टीचा शोध घेण्याची गरज आहे.
सुनील पटले यांच्या खात्यात रक्कम वळते झाल्याचे जाहीर असताना तो व्यक्ती आज जामीन घेऊन बाहेर फिरत आहे,तर इतर मात्र पोलिस कोठडीत बसले आहेत.बँकेतून रक्कम पटलेच्या खात्यावर जमा झाल्यामुळे बँकेचे व्यवस्थापक आत जाऊ शकतो तर ज्या कॅशीयरने रक्कम ट्रान्सफर केली तो का नाही अशा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे. बँक व्यवस्थापकांकडे कामाचा अधिक व्याप असतो असे गृहीत धरून त्याने जर टेबलावरील काम काढण्याच्या घाईगर्दीत स्वाक्षरी केलीही असेल परंतु जेव्हा तो धनादेश कॅशीयरकडे गेला तेव्हा त्या कॅशीयरने सुद्धा ती चूक बँक व्यवस्थापकांच्या लक्षात का आणून दिली नाही हा महत्वाचा प्रश्न या तपासात यायला हवा.या प्रकरणात बँकेच्या कॅशीयरने आपण शिक्षकांच्या खात्यात पैसे वळते करण्याएैवजी खासगी खात्यात वळते करीत असल्याची माहिती बँक व्यवस्थापकासह पंचायत समितीच्या प्रशासनाला कळवायला हवे होते.त्याने सुद्धा ही माहिती लपविल्याने तो कॅशिअर सुद्धा मग या प्रकरणात चौकशीच्या का आला नाही या सर्व गोष्टींचा सखोल तपास पुन्हा होणे गरजेचे आहे.सोबतच गोंदिया जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील जे अधिकारी नेहमी पंचायत समितीला तपासणीच्या नावावर भेट देण्यासाठी जातात त्या काळात गेलेल्यांचीही चौकशी होणे अपेक्षित आहे.
सडक अर्जुनी पंचायत समिती शिक्षण विभागाचे लिपिक सुनील पटले यांनी जवळपास एक कोटी रुपयांच्या केलेल्या घोटाळ्याप्रकरणी दोन गटशिक्षणाधिकारी आणि दोन बँक व्यवस्थापकांना २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी (दि.२०) फौजदारी व दिवानी न्यायालय सडक अर्जुनी येथे त्यांना आणले असता न्या.साठे यांनी २ जुलैपर्यंत एमसीआर दिला. त्यामुळे त्या चौघांची रवानगी भंडारा कारागृहात करण्यात आली आहे.
सुनील पटले यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असून त्यांचेशी संबंधित असलेले आरोपी सडक अर्जुनी पं.स.चे गटशिक्षणाधिकारी मुनेशवर मेश्राम, तत्कालीन गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक सोयाम, को-ऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक सुनील राऊत, तत्कालीन शाखा व्यवस्थापक बी.एम. मंडपे यांना चौकशीमध्ये घेऊन सुरवातीला १७ जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. नंतर २० जूनपर्यंत पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली. आणि आता त्यांना २ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सोमवारी न्यायालयात हजर केले त्यावेळी आपली जमानतीवर सुटका होईल असे आरोपींना वाटत असताना त्यांची जमानत होऊ शकली नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रकरण साधे नसून फार गुंतागुंतीचे असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा अधिक खोलवर तपास व्हावा याकरिता डुग्गीपार पोलिस स्टेशनचे ठाणेदार राजकुमार केंद्रे तपासात गुंतले आहे.