नझूल शिट क्र. 8 व 9 प्लॉट क्र. 4 मधील जागा वाहनतळासाठी गोंदिया न.प.ला मंत्रीमंडळाची मंजुरी

0
10

गोंदिया,दि.21- सार्वजनिक प्रयोजनासाठी गोंदिया नगरपरिषदेस शासकीय जागा देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
गोंदिया नगरपरिषदेला सार्वजनिक प्रयोजनासाठी 1440 चौ.मी. आणि सार्वजनिक वाहनतळासाठी 560 चौ.मी. शासकीय जमीन भोगाधिकार मूल्यरहित पद्धतीने देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.या निर्णयानुसार गोंदिया येथील नझूल शिट क्र. 8 व 9 प्लॉट क्र. 4 मधील शासकीय जमीन नगरपरिषदेस देण्यात येणार आहे. जमीन वापराचे सार्वजनिक प्रयोजन ठरविण्यासाठी गोंदिया पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. गोंदिया शहरातील संबंधित भागाच्या सार्वजनिक गरजा, कायदा व सुव्यवस्था आणि वाहतूक इत्यादी बाबी विचारात घेऊन या जमिनीचा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने नियमानुसार वापर करण्याचा समिती निर्णय घेईल.