शनिवारी गोरेगाव येथे समाधान शिबीर

0
14

गोरेगाव, दि.२३ : शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व लाभार्थ्यांना एका ठिकाणी मिळावी तसेच विविध लाभार्थ्यांना योजनांचा लाभ तसेच साहित्याचे वितरण करण्यासाठी शनिवारी २५ जून रोजी महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन गोरेगाव येथील शहिद जाम्या तिम्या हायस्कूलच्या प्रांगणात सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.
पालकमंत्री राजकुमार बडोले हे समाधान शिबिराचे उदघाटन करतील. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी हे असतील. यावेळी जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, खा.प्रफुल पटेल, खा.नाना पटोले, आमदार राजेंद्र जैन, आमदार विजय रहांगडाले, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, गोरेगाव नगराध्यक्ष सीमा कटरे, पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे व तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांनी केले आहे.