कॉंग्रेसचा एनआयटीवर भव्य मोर्चा

0
6

नागपूर,दि.23-पूर्व नागपुरातील क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्यांकडे एनआयटीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप करीत नागरिकांनी पूर्व नागपूर कॉंग्रेस कमिटीचे सचिव उमाकांत अग्निहोत्री यांच्या नेतृत्वात आज मोर्चा काढला.पूर्व नागपुरातील विजयनगर, धरमनगर, नवकन्यानगर, आदेश सोसायटी, शिवशंभूनगर, दुर्गानगर, तलमले लेआउट, साईनगर, भगतनगर, राम मंदिर इत्यादी परिसरातील घरांमध्ये पावसाच पाणी शिरत, रस्त्यावर खड्डे असल्याने अपघात होत आहेत, गटर लाईन, सिवेज लाईन नसल्याने त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच सांसद निधीमधून बनलेल्या समाज भवनही आता आरटीओ कार्यालय बनले आहे. यासर्व मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला असून या संबंधीचे निवेदन पत्र एनआयटी सभापतींना देण्यात आले. या मोर्च्यात ब्लॅक अध्यक्ष एम.एम. शर्मा, पुरुषोत्तम लोणारे, कामत श्रीवास, राबिया शाह इत्यादी सहभागी झाले होते.