नवे वारे नवी दिशा, मतदान आहे उद्याची आशा…..तरुणाईचा मतदारांना संदेश

0
1

अर्जुनी मोरगाव- 19 एप्रिलला होणाऱ्या भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे या करिता शिवप्रसाद सदानंद जायसवाल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी पथनाट्या तून जागृती घडवून आणली. स्वीप अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात पहिल्याच टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होत आहे. या पार्श्भूमीवर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निष्पक्ष मतदान करावे असा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला . मतदानाच्या दिवशी सुट्टी असते म्हणून मनदानाचे कर्तव्य पार पाडूनच इतर कामे केली पाहिजे , मतदान टाळू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले
एसबीआई बँक समोर हे पथ नाट्य सादर करण्यात आले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. निष्पक्ष मतदान करू, लोकशाहीला बळकट करू अश्या घोषणा देतातदरांना आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी स्विपच्या नोडल अधिकारी स्वाती तायडे, अमोल जाधव, सुरेश बोरीकर, मिडियाचे नोडल अधिकारी डॉ शरद मेश्राम, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ एम आर दर्वे, नयनकुमार शहारे आदी उपस्थित होते.