सोनारटोला व देऊटोला वरवधूंसह,नवमतदारांनी बजाविला मतदानाचा अधिकार

0
19

गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आज, १९ एप्रिल रोजी सकाळपासुन मतदानाला सुरवात झाली आहे.नवमतदारासंह,युवक,वयोवृध्द व दिव्यांग मतदारांनीही सकाळच्या सुमारास मतदानात उत्साहाने सहभाग नोंदवला.मात्र दुपारनंतर मतदान केंद्रावर मात्र शुकशुकाट बघावयास मिळाले.भंडारा-गोंंदिया या लोकसभा मतदारसंघाच्या व  गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुक संग्रामात आज गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील देऊटोला व देवरी तालुक्यातील सोनारटोला येथील मतदान केंद्रावर नवरदेव/नववधूनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावल्याचे चित्र बघावयास मिळाले.

गडचिरोली-चिमूर लोकसभा (एसटी राखीव)मतदारसंघातील देवरी तालुक्यातील सोनारटोला येथे किरण श्रीकिसन बहेकार या वधुने वर चितेश भिमाजी बागडे यांच्यासोबत मतदान केंद्रावर जाऊन नातेवाईंकासह मतदानाचा हक्क बजावला.

नवमतदार- दिव्या रिनाईत

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील गोंदिया विधानसभा मतदारसंंघातर्गंत येत असलेल्या टेमणी येथील मतदान केंंद्रावर पहिल्यांदाच मतदान करण्याकरीता आलेल्या दिव्या रिनाईत या युवतीने देशाच्या विकासाकरीता मतदान करीत असल्याचे सांगितले.तसेच प्रत्येक एका मताचे महत्व असून प्रत्येक नवमतदारांने मतदान करावे असेही ती म्हणाली.
नवमतदार तुलशी बिसेन
गोंदिया विधानसभा मतदारसंघातील बरबसपूरा येथील मतदान केंंद्रावर पहिल्यांदा मतदान करण्याकरीता आलेली तुलशी बिसेन या नवमतदाराने गेल्या १० वर्षातील विकासाला व सध्या देशात जे कार्य सुरु आहे,त्यास बघून मतदान करतांना मनात उत्साह होता असे सांगितले.