अति.घरभाड्यासह जि.प. कर्मचार्यांनी मागितली सुरक्षा

0
9

गोंदिया,दि.24-गोंदिया जिल्हा परिषदेतर्गंत काम करणाक्या कर्माचार्यांना शासनाने मंजुर केलेले नक्षलग्रस्त भाग म्हणूनचे अतिरिक्त घरभाडे देण्यास गोंदिया जिल्हा परिषदेतील वित्त विभाग आडकाठी आणत असल्याचा आरोप कर्माचारी महासंघाने केला असून वित्त विभागातून यासंबधीची फाईलच गायब असल्याची तक्रार जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांच्याकडे गुरुवारला लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना व जिल्हा परिषद कर्माचारी महासंघाच्यावतीने करण्यात आली.लिपिक वर्गीय कर्माचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष खत्री,सचिव सौरभ सचिव,प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस एल.यु.खोब्रागडे,संतोष तोमर,परिचर नेवारे, आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.त्यांनी भंडारा,गडचिरोली,चंद्रपूरसह नक्षलग्रस्त जिल्ह्यातील वर्ग 3 व 4 च्या कर्मचार्यांना शासनाने अतिरिक्त घरभाडे मंजुर केले आहे.पंरतु गोंदिया जिल्हा परिषद हे घरभाडे गेल्या अनेक वर्षापासून देत नसल्याचे म्हणने आहे.जेव्हा की वरिष्ट अधिकारी वर्ग 1 व 2 चे आपले अतिरिक्त घरभाडे घेत आहेत.मात्र आमच्यावर अन्याय करीत असल्याचे म्हटले आहे.वित्त विभागाचे प्रमुख रा.मा.चव्हाण यांच्याकडे गेल्यावर ते या प्रकरणाची फाईल लेखाधिकारी जंवजांळ याच्याकडे असल्याचे सांगतात.जेव्हा अध्यक्ष श्रीमती मेंढे यांनी जवंजाळ यांना विचारणा केली असता त्यांनी आपल्याकडे फाईलच नसल्याचे सांगितले.यावरुन कर्माचारी वर्गात असतोंष दिसून येत आहे.तर काही बाह्यनागरिक कार्यालयात येऊन दमदाटी करीत असल्याने आम्हाला काम करतांना असुरक्षित वाटत असल्याने आम्हाला सुरक्षा सुध्दा देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.यावर जि.प.अद्यक्षानी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून गोंदिया जिल्हा परिषद ही प्रशासकीय इमारत असून नक्षलग्रस्त जिल्ह्यातील महत्वाचे कार्यालय असल्याने या इमारतीला 24 तास सुरक्षा रक्षक उपलब्ध करुन द्यावे असे पत्र पाठवले आहे.