खासगी शैक्षणिक संस्थांच्या मनमानीविरोधात पालकांची धाव

0
8

गोंदिया,दि.24-गोंदिया शहरातच नव्हे तर खेड्यापाड्यात सीबीएसई शिक्षणाच्या नावावर मोठमोठ्या आणि अशासकीय इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या दरदिवशी वाढतच चालली आहे.त्यातच शिक्षण शुल्कसोबतच बस शुलक्,ड्रेस,जुते ,नोटबुक्स आदी आमच्याच शाळेतून खरेदी करण्याचे फर्मान सोडले जात आहे.विशेष म्हणजे सीबीएसईच्या नावावर दरवर्षी अभ्यासक्रम बदलवून पुस्तक विक्रीचा गोरखधंदा खासगी इंग्रजी माध्मयांच्या शाळेत मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने त्यावर आळा घालण्याची मागणी गोंदियातील एका व्हाटसअप गृपच्या सदस्यांनी चर्चेच्या माध्यमातून केली.चर्चाच नव्हे तर त्या गृपचे एडमीन हर्षल पवार यांनी काही पालक व गृपमधील सदस्यांना सोबत घेऊन गुरुवारला जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यंवशी यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी सविस्तर एैकुन घेत खासगी शाळांच्या मनमानीवर आळा घालण्यासाठी आपण पालकासोबत असल्याचे स्पष्ट करीत जिल्हा परिषदेच्या व नगरपरिषदेच्या शाळातही चांगले शिक्षण मिळत असल्याने त्याकडे पालकांनी आपल्या पाल्यांना पाठवावे असेही आवाहन केले.जिल्हाधिकारी यांनी खासगी शाळांच्या या मनमानी कारभाराची चोकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या दोन्ही शिक्षणाधिकारी यांना लगेच दिली आहे.यावेळी हर्षल पवार,दुर्गेश रहागंडाले,कैलास भेलावे,सविता तुरकर,अॅड.अर्चना नंदागळे,सुनिल जैन,विजय अग्रवाल,हरीष गुप्ता,सोनू सुर्यवंशी,आदेश शर्मा,अंकुश जोशी उपस्थित होते.