चिल्हाटी-ककोडी मार्ग महाराष्ट्र-छत्तीसगड आवगमनास प्रतिबंध

0
12

गोंदिया,दि.२४ : लोकांची जिवित हानी टाळण्याच्या दृष्टीने व रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील जूना जिल्हा प्रमुख मार्ग क्र.५४ व आताचा नवीन राज्य मार्ग क्र.३५८ ग्राम चिल्हाटी-ककोडी ते महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत २ कि.मी. अंतरापर्यंत वाहनाची एकूण नोंदणीकृत भारक्षमता १२,००० किलोग्रॅम व त्यापेक्षा जास्त नोंदणीकृत भारक्षमता असलेली जड वाहतूकीस तसेच २.५ मीटर इतक्या उंचीपेक्षा व ३ मीटर इतक्या रुंदीपेक्षा जास्तीच्या मालवाहू वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. ही अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार १५ जून २०१६ पासून अंमलात आली आहे.
सदर प्रतिबंध आणल्यामुळे सीमा तपासणी नाका, शिरपूर (देवरी) ला चुकवून देवरी येथून जूना (जिल्हा प्रमुख मार्ग क्र.५४) नवीन राज्य मार्ग क्र.३५८ चिल्हाटी-ककोडी मार्गाने कल्लू-बंजारा, छुरिया(छत्तीसगड) राज्यात प्रवेश करण्यास तसेच छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्र प्रवेश करणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया यांनी दिली.