२७ जून शाळा प्रवेशोत्सव ;अधिकारी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत

0
25

गोंदिया,दि.२४ : २७ जूनपासून जिल्ह्यातील शाळा सुरु होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नव्याने प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत अधिकारी वर्ग करणार आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत करुन शाळेचे वातावरण चैतन्यमन आणि उत्साहवर्धक राहावे हा शाळा प्रवेशोत्सवाचा उद्देश आहे. या
या कार्यक्रमाअंतर्गत शाळा सुरु होण्याच्या पूर्व दिवशी व शाळेच्या पहिल्या दिवशी विविध उपक्रम घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व प्रभावी अंमलबजावणीसाठी गटशिक्षणाधिकारी यांना तालुक्यातील शंभर टक्के शाळा भेटीचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शाळा सुरु होण्याच्या पूर्व दिनी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने शाळेत नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देणे, पदयात्रा, शाळा परिसर स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. नवादतांचे स्वागत करण्यात येवून विद्यार्थ्यांना कोऱ्या करकरीत नवीन मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थी गणवेशात शाळेत येणार आहे. मध्यान्ह भोजनामध्ये गोड पदार्थाचा समावेश करण्यात येणार आहे.
शाळा प्रवेशोत्सव या महत्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात शिक्षण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तसेच राज्य शासनाच्या इतर विभागातील वर्ग-२ व त्यावरील अधिकाऱ्यांनी भेटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यामार्फत शाळा भेटीचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील आठ तालुक्यातील किमान २ ते ३ शाळांना हे अधिकारी भेटी देवून सोबत दिलेल्या प्रपत्रात आपला अहवाल सर्व शिक्षा अभियान कार्यालय जिल्हा परिषद गोंदिया यांना २७ जून रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत सादर करणार आहे.
ज्या अधिकाऱ्यांना शाळा प्रवेशानिमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत करावयाचे आहे त्या अधिकाऱ्यांचे नाव व त्यांच्याशी संबंधित तालुक्याची निवड करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी- सडक/अर्जुनी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम- तिरोडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एम.अंबादे- सालेकसा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.जे.बागडे- आमगाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए.देशमुख- अर्जुनी/मोर., प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ.एम.एस.चव्हाण- देवरी, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे- आमगाव, कार्यकारी अभियंता(ल.पा.) जिल्हा परिषद एस.एस.पथाडे- गोंदिया, कार्यकारी अभियंता(बांधकाम) जिल्हा परिषद एस.पी.खांडरे- गोरेगाव, प्रभारी कार्यकारी अभियंता(ग्रा.पा.पु.) एस.आर.शर्मा- सालेकसा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राज गहलोत- सडक/अर्जुनी, प्रभारी सहायक कामगार आयुक्त उज्वल लोया- तिरोडा, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी- देवरी, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे- अर्जुनी/मोर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) उल्हास नरड- सडक/अर्जुनी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रशांत डवरे- आमगाव, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे- गोरेगाव, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) लोकेश मोहबंशी- गोंदिया, शिक्षण विस्तार अधिकारी एन.जे.सीरसाठे- आमगाव, शिक्षण विस्तार अधिकारी ए.के.खडसे- सालेकसा, शिक्षण विस्तार अधिकारी एस.एन.रामरामे- सडक/अर्जुनी, शिक्षण विस्तार अधिकारी महेंद्र मोटघरे- गोरेगाव, शिक्षण विस्तार अधिकारी आर.पी.रामटेके- तिरोडा, कार्यकारी अभियंता(स.शि.अ.) जीवनेश मिश्रा- गोंदिया, जिल्हा समन्वयक बाळकृष्ण बिसेन- गोरेगाव, कुलदिपीका बोरकर- गोंदिया, विजय ठोकणे- आमगाव, विलास मलवार- तिरोडा, कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले- आमगाव, संशोधन सहायक भुषण रहमतकर- गोरेगाव आणि संबंधित तालुक्यांच्या तहसिलदार, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे त्यांच्याच तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.