वीज पडून पती ठार,पत्नी जखमी

0
6

यवतमाळ-जिल्ह्यातील पुसद तालुक्या अंतर्गत येणाऱ्या गौळ (खु) शिवारात शेतात काम करत असताना वीज पडून एकाचा मृत्यू तर एकजन गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली.मारोती चव्हाण असे मृतकाचे नाव आहे.नेहमी प्रमाणे मारोती चव्हाण आजदेखील शेतात काम करण्यासाठी गेले. मात्र विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाल्याने ते शेतातीलाच झाडाखाली थांबले .यावेळी त्यांचासोबत त्यांची पत्नी शांताबाई यादेखील होत्या.मात्र अचानक वीज पडल्याने मारोती चव्हाण यांचा जागेवरच मृत्यू झाला तर शांताबाई या गंभीर जखमी झाल्या.जखमी असलेल्या शांताबाई यांना त्वरित पुसद येथील शासकीय रुगणालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पोलिसांनी घटनास्थळ गाठून अकस्मात मृत्यूची नोंद केली.