ओबीसीच्या थकीत शिष्यवृ्त्तीसाठी भाजप ओबीसी आघाडीचे निवेदन

0
17

आमगाव,दि.26-गोंदिया जिल्हा समाज कल्याण विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे विद्यार्थांना २०१४-१५ या वर्षातील शिष्यवृत्ति न मिळाल्याचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीच्यावतीने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरिता आर्थीक अडचणींना समोर जावे लागत आहे.शिक्षण शुल्क भरले नसल्यामुळे पुढील शिक्षणात अडचणींचा सामना करावा लागत अाहे.विभागाने थकीत शिष्यवृत्ति निधी वाटप केलेली नाही.सदर थकीत शिष्यवृत्ति त्वरीत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.मंत्री राजकुमार बड़ोले यांना भाजप जिल्हा आेबीसी आघाडी महामंत्री यशवंत मानकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.यावेळी भाजप तालुका अद्यक्ष अॅड यशुलाल उपराडे,राकेश शेंडे,जि.प.सदस्य शोभेलाल कटरे,माजी सभापती हनवट वट्टी,युवा मार्चा महामंत्री कमलेश चुटे,महिला आघाडी अद्यक्ष सौ.मोहिनी निम्बातै,अंजली जांबूळकर,गजेंद्र चुटे,निखील मेश्राम,रजत शेंडे,राजा शेंडे,अविनाश साखरे,अजिंक्य निम्बाते उपस्थित होते.