अधिवेशनाच्या पुर्वे तयारीसाठी २ जुर्लेला नागपूरात ;गोंदियात ३० जून रोजी बैठक

0
9

ओबीसी संघर्ष कृती समितीची बैठक
गोंदिया,दि.26-ओबीसी समाजाला घटनेतील तरतुदीनुसार न्याय मिळावा यासाठी तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी.qसग यांनी लागू केलेल्या मंडल आयोगाला २५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने विदर्भातील सर्व ओबीसी संघटना मिळून येत्या ७ ऑगस्ट २०१६ रोज रविवारला डॉ.पंजाबराव देशमुख सभागृह,धनवटे नॅशनल कॉलेज येथे एक दिवसीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात २५ जून रोजी झालेल्या सभेत विविध समित्यांचे गठण करण्यात आले असून या समित्यांचा विस्तार करण्यासाठी येत्या २ जुर्ले रोज शनिवारला दुपारी २ वाजता धनवटे नॅशनल कॉलेज नागपूरच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यासोबतच गोंदिया जिल्ह्यात ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघाच्यावतीने जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमासंदर्भात तसेच नागपूर अधिवेशनाच्या चर्चेसंदर्भात चर्चा करण्यासाठी ३० जून रोजी सायकांळी ५ वाजता विश्रामगृह गोंदिया येथे बैठकिचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी दिली आहे.
प्राचार्य बबनराव तायवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ओबीसी अधिवेशन समिती,समन्वय समिती,प्रचारप्रसिध्दी समिती,अर्थविषयक समिती,भोजन समिती,वक्ता व संचालन समिती,साहित्य निर्मिती समिती,मान्यवर व्यवस्थापन समिती,स्मरणिका प्रकाशन समिती त्याचप्रमाणे सर्वजातीय संघटना व ओबीसीसंघटनाशी संपर्क करण्याकरिता समन्वय समिती तयार करण्याबाबत चर्चा करून प्राथमिक नावे या समितीमध्ये ठरविण्यात आली.अधिवेशनात ओबीसींची जनगणना व ओबीसी मंत्रालयाची गरज,नॉन क्रिमिलेयर आणि स्कालरशिपचा प्रश्न,आरक्षणाची न झालेली अमलबजावणी व असलेला गैरसमज आणि ओबीसी महिलांचे सामाजिक दुख आदी विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
प्रचार प्रसिद्धी समितीमध्ये खेमेंद्र कटरे,चंद्रकांत बहेकार,सावन डोये,वक्ता व संचालन समितीमध्ये प्रा.नूतन माळवी,प्रा.डॉ.एन.जी.राऊत,स्मरणिका ,साहित्य प्रकाश समितीमध्ये प्रा.शेषराव येलेकर,सुषमा भड,पांडुरंग काकडे ,सावन कटरे गोंदिया,भोजन समितीमध्ये पांडुरंग काकडे,भैय्याजी रडके,हेमराज भाले,समन्वय समितीमध्ये शरद वानखेडे,विजय तपाडकर,विनोद उल्लीपवार,मनोज मेंढे व कैलास भेलावे गोंदिया,गोपाल सेलोकर भंडारा आदींचा समावेश आहे.
या समित्यांना विस्तारित स्वरूप देण्यासाठी येत्या २ जुर्ले रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच स्मरणिकेसाठी ओबीसीवर आधारित साहित्य,शासकीय आदेश,ओबीसी सोबत शासनाने केलेला अन्याय आदींवर साहित्य लेख सुद्धा आमqत्रत करण्यात आले आहे.या बैठकीला ओबीसी कृती समितीचे संयोजक सचिन राजूरकर,डॉ.एन.जी.राऊत,पांडुरंग काकडे,शरद वानखेडे,खेमेंद्र कटरे,भूषण दडवे,गुणेश्वर आरीकर,डी.डी.पटले,सुषमा भड,विजय तपाडकर,विनोद उल्लीपवार,भारती कटरे,मुस्कान कटरे आदी उपस्थित होते.