शिवसैनिकांनी केली भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड

0
10

यवतमाळ,दि.27-जिल्ह्यातील उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेंद्र नजरधने यांच्या कार्यालयाची तोडफोड करून कार्यालयावर मोर्चा काढण्यर्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना आज(दि.27)घडली.आमदाराच्या घरावर स्थानिक काही मुद्यासह पिक विमा मिळावा,कर्जाची वसुली थांबावी यासाठी मोर्चा काढण्याची मागितीलेली परवानगी पोलिसांनी नाकारल्याने संतप्त काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला.या प्रकरणी पोलिसांनी १० शिव सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तर जमावाने केलेल्या दगडफेकीत भाजप शहर प्रमुख सुरेश नरवाडे गंभीर जखमी झाले.शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा,शेतकऱ्यांची पिक कर्जसाठीची अडवणूक थांबवावी,२० हजार रुपये दुष्काळी निधी मिळावा आदी मागण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस,महाराष्ट्र नवनिर्माण सेना,किसानसभा यांच्यावतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता.परंतु ऐनवेळी स्थानिक शिव सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी हा मोर्चा आमदार नजरधने यांच्या घरावर घेऊन जाण्याचा आग्रह केला. मात्र आमदार नजरधने यांच्या घरावर मोर्चा नेण्यास पोलिसांनी परवानगी दिली नाही.दरम्यान हा मोर्चा आमदारांच्या कार्यालयावर पोहोचला. त्या ठिकाणी गोंधळ सुरू झाला. त्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी लाठीमार केला. मोर्चातील नागरिक सैरावैरा पळू लागले. यावेळी चेंगराचेंगरी होऊन काही जण जखमी झाले. पोलिसांनी मोर्चेकर्‍यांना पांगविल्यानंतर शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद भरवाडे यांच्यासह काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले.या सर्वपक्षीय मोर्चातील मागण्यांचे निवेदन आपण स्वीकारले आहे,सर्व सुरळीत असताना काही समाजकंटकांनी मला टार्गेट करून इतरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया आमदार राजेंद्र नजरधने यांनी दिली.