वैनगंगा नदीत बुडून तिघांचा मृत्यू , मृतकांमध्ये दोन सख्खे भाऊ

0
8

गडचिरोली,दि.27- चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थानातील वैनगंगा नदीत बुडाल्याने ११ वर्षीय बालकासह तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुखद घटना रविवारला घडली आहे.या घटनेतील मृतकांमध्ये वाशीम येथील दोन भावांचा समावेश आहे.मृतकात अंकुर पाठक (२२)वर्ष वाशीम वैभव पाठक १६ वर्ष वाशीम हे दोन सख्खे भाऊ आणि त्यांच्या मेहुणा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील ११ वर्षीय गणेश अप्पलवार यांचा मृत्यू झाला.
विदर्भाची काशी मानल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या मार्कंडा मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात.रविवारला सकाळी वाशीम जिल्ह्यातील पाठक परिवार आणी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील अप्पलवार परिवार मार्कंडा येथे आले होते. दोनही परिवार एकमेकांचे नातेवाईक असल्याने दोनही परिवार एकत्रच मार्कंडा येथे दर्शनासाठी आलेत.येथे मार्कंडा ऋषींचे पुरातन मंदिर आहे आणी मंदिराच्या अगदी समोर वैनगंगा नदी आहे.या नदीत तीन मुले आणी तीन मुली आंघोळ करण्यासाठी वैनगंगा नदीच्या पात्रात उतरले.पाहता पाहता तिघे जण नदीच्या खोल पाण्यात गेले. आणी पाण्यात बुडाल्याने तिघांचा मृत्यू झाला. घटनास्थळावर पोलीस जाऊन पाण्यातून तिघांचे शव बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी चामोर्शी रुग्णालयात पाठविण्यात आले.या दुखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे