नागपूर जिल्ह्यात मंगळवारला खरीप पीक कर्ज मेळावे

0
11

नागपूर दि.27 :नागपूर जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी उद्या मंगळवार दि.28 जून रोजी जिल्हयातील सर्व तालुका मुख्यालयी खरीप पीक कर्ज वाटप मेळावे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे मेळावे आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांने या खरीप पीक कर्ज मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.या मेळाव्यात कर्जासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे मिळतील. तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पीक कर्ज वाटप समितीमध्ये बँकेचे अधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.