गृह राज्यमंत्री राम शिंदे जिल्ह्यात

0
12

गोंदिया,दि.१ : गृह राज्यमंत्री राम शिंदे हे आज (ता.२) जिल्ह्याचे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. मुंबई येथून दुपारी १ वाजता खाजगी विमानाने गोंदियाकडे प्रयाण. दुपारी २.४५ वाजता गोंदिया विमानतळ येथे आगमन. दुपारी ३ वाजता शासकीय मोटारीने सडक/अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार कडे प्रयाण. दुपारी ३.४५ वाजता डुग्गीपार येथे आगमन व डुग्गीपार पोलीस स्टेशन इमारतीचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ५ वाजता शासकीय मोटारीने गोंदियाकडे प्रयाण. सायंकाळी ५.४५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच पर्यटन विकास कामांबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी ७ वाजता शासकीय मोटारीने विश्रामगृहाकडे प्रयाण. सायंकाळी ७.१० वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व राखीव. रात्री ८ वाजता शासकीय मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.