जलयुक्त शिवार अभियानाची कामे वेळेत पूर्ण करा

0
4

भंडारा दि.2 : शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारची कामे वेळेच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश पालक सचिव दीपक कपूर यांनी दिले. त्याच प्रमाणे पिक कर्ज वाटप व कर्ज पर्नगठणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावेत, अशा सूचना संबंधितांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विभागाची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस धीरजकुमार, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलिस अधिक्षक विनीता साहू, मुख्य कायर्कारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, उप वनसंरक्षक एन. आर. प्रविण, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुनिल पडोळे, सुजाता गंधे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. नलिनी भोयर उपस्थित होते.
या बैठकीत पालक सचिव यांनी शेतकर्‍यांना देण्यात आलेले पिक कर्ज व कर्जाचे पुर्नगठण, पिक पाणी परिस्थिती, बी-बियाणे व खत पुरवठा, जलयुक्त शिवार अभियान, पाणी टंचाई, २ कोटी वृक्ष लागवड, अन्न सुरक्षा कायदयाची अंमलबजावणी व धान भरडाईची सद्यस्थिती आदि विषयाचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.