रतनारा येथे ४५०० हजार वृक्ष लागवड;कोषागार कार्यालयात वृक्षारोपण

0
7

गोंदिया,दि.३ : १ जुलै रोजी २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत गोंदिया जवळील रतनारा येथे सामाजिक वनीकरण व गोंदिया पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त वतीने ४५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. गोंदिया पब्लिक स्कूल व ग्रामस्थांनी वृक्षदिंडी काढली. गावात वृक्ष लागवडीची जागृती केल्यानंतर ग्रामस्थांना सोबत घेऊन विद्यार्थी ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीबाबत पथनाट्य सादर केले. सामाजिक वनीकरणचे उपसंचालक पी.एस.बडगे, लागवड अधिकारी युवराज कुंभलकर, रतनारा येथील सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य, गोंदिया पब्लिक स्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या प्रभारी वर्षा भांडारकर, शिक्षक अविनाश गोंदोळे, शेखर बिंदानी, सीमा घौरे, सरिता जैन, आलोक राठोड, जगदिश लांजेवार, गणेश शेन्डे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
२ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत कोषागार कार्यालयाच्या परिसरात कोषागार कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केले. वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत १० वडाचे व १० अशोकाचे झाडे लावण्यात आले. जिल्हाधिकार डॉ.विजय सूर्यवंशी यांनी वृक्ष लागवड करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे, अपर कोषागार अधिकारी पी.डी.पारधी, उपकोषागार अधिकारी आर.व्ही.पांडे, एस.व्ही. तोमर, पी.डी.मुंडले, वरिष्ठ लिपीक एस.व्ही.बैस, एस.जी.डोंगरे, टी.टी.मेश्राम, कनिष्ट लिपीक आर.एल.पटले, एम.एफ.मेश्राम, एस.बी.मडावी, लेखा लिपीक, एस.डी.भैरम, ए.एस.तेलतुंबडे, एस.व्ही.उके, दप्तरी एन.के.शृंगारपवार, शिपाई एस.सी.कुंभरे, श्रीमती एस.ए.पांडे, जी.टी.वाघाये यांची सहभाग घेतला.
कोषागार अधिकारी नेमाडे व कर्मचारी यांनी गावागावातून जमा केलेल्या २२ हजार बाभळीच्या बिया व कॅशीयाच्या ४ हजार बिया जमा करुन लावण्यात येणार आहे. सदर बियाणे रोपण सुट्टीच्या दिवशी कार्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात, वन जमिनीवर व सिंचन प्रकल्पाच्या परिसरात लावण्यात येणार असल्याची माहिती कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे यांनी दिली.