चावडी चौक ते पांगोली नदी मार्गाचे सव्वा कोटीचे काम सुरू

0
26

नगराध्यक्ष जायस्वाल यांच्या हस्ते भूूमिपूजन
गोंदिया : प्रभाग क्र. १० क्षेत्रातील चावडी चौक ते पांगोळी नदी मार्गाचे भूमिपूजन ३० जुन रोजी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या हस्ते व बांधकाम सभापती बंटी पंचबुध्दे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
सदर काम १ कोटी २४ लाख रूपयाच्या निधीतून करण्यात येत आहे. नगरसेवक महेंद्र उईके यांच्या माध्यमातून सदर काम प्रस्तावित करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने नगरसेवक घनश्याम पानतावने, राहूल यादव, विष्णू नागरीकर, संतोष पटले, श्याम चौरे, श्रावण भगत, चमन टेंभरे, चेतन भगत, नंदू सनवारे, प्रकाश बुध्दे, छोटू पंचबुध्दे, कारू मेश्राम, सुरेंद्र वाढईकर, जगन चव्हाण, लक्ष्मीकांत डहाट, किसन भगत, मारोती फेंडारकर, अरूण भगत, देवराम फेंडारकर, हेमंत भगत, शंकर भगत आदी प्रभागातील नागरिक उपस्थित होते.