जिल्ह्यात सरासरी १९७.६ मि.मी.पाऊस

0
6

गोंदिया,दि.५ : जिल्ह्यात १ जून ते ५ जुलै २०१६ या कालावधीत ६५२१.६ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी १९७.६ मि.मी. इतकी आहे. आज ५ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३२६.५ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी ९.९ मि.मी. इतकी आहे.५ जुलै रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- १२ मि.मी. (१.७) , गोरेगाव तालुका- २४ मि.मी. (८.०), तिरोडा तालुका- २.३ मि.मी. (०.५), अर्जुनी मोरगाव तालुका- ९८.८ मि.मी. (१९.७), देवरी तालुका- १०० मि.मी. (३३.३), आमगाव तालुका- ३३ मि.मी. (८.३), सालेकसा तालुका- ११.२ मि.मी. (३.७) आणि सडक अर्जुनी तालुका- ४५.२ मि.मी. (१५.१) असा एकूण ३२६.५ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ९.९ मि.मी. इतकी आहे.