बीडीओच्या जाचास कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या

0
9

उदगीर : देवणी पंचायत समितीत कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने मंगळवारी सकाळी उदगीरच्या राहत्या घरी गळफास लावून घेतल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी नातेवाईकांनी गटविकास अधिकाऱ्यावर जाच केल्याचा आरोप केला आहे़

उदगीर तालुक्यातील मूळचे चांदेगाव येथील रहिवासी विवेक सिरसे (वय ४२) देवणी पंचायत समितीत कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत होते़ ते उदगीरच्या विकास नगर भागात वास्तव्यास होते़ नोकरीसाठी दररोज उदगीर-देवणी ये-जा करायचे़ दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात वावरत हाते, असा त्यांच्या कुटूंबियांचा दावा आहे़ त्यातच मंगळवारी सकाळी त्यांनी घरातच पंख्याला गळफास लावून घेतल्याचे उघडकीस आले़ यासंदर्भात त्यांचे बंधू वसंत शिरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़