… अन्यथा पालिकेच्या दारात कचरा घालू!

0
13

युवा स्वाभिमानचा पालिका प्रशासनाला झणझणीत इशारा :ड़म्पींग यार्ड हटविण्याची मागणी
गोंदिया : शहरातील मोक्षधाम परिसरात उघड्यावर शहरातील कचरा पेâकला जात आहे. मोक्षधामाच्या मागच्या परिसरात मेलेली जनावरेसुद्धा पेâकण्यात येतात. परिणामी घाण व दुर्गंधीने सेलटॅक्स कॉलोनीतील जनता त्रस्त झाली आहे. नागरिकांसह परिसरातील शालेय विद्याथ्र्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने हे डम्पींग यार्ड त्वरीत हटवावे अन्यथा तेथील कचरा पालिकेच्या दारात घालण्यात येईल, असा इशारा युवा स्वाभिमानने दिला आहे.
गणेशनगर परिसरातील नागरिकांनी युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांच्या नेतृत्वात ६ जून रोजी जिल्हाधिकाNयांना निवेदन दिले होते. दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी यांनी पालिकेच्या मुख्याधिकाNयांना यासंबंधी लेखी आदेश देवून अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येईल असे आश्वासनदेखील प्रशासनाने दिले होते. परंतु या आश्वासनाला दोन ते अडीच महिण्याचा कालावधी लोटला परंतु आश्वासनाची पुर्तता झाली नाही. कुजलेली जनावरे आणि पेâकलेल्या कचNयाच्या घाण व दुर्गंधीमुळे परिसरातील जनतेचे तेथे जगणे कठीण झाले आहे.
शहरातील मोक्षधाम मार्ग परिसरातील गणेशनगर, साई माऊली कॉलनी, सेलटॅक्स कॉलनी, स्टेट बँक कॉलनी तसेच लगत असलेली शारदा कॉन्वेंट व इतर शाळा येथील विद्यार्थी व परिसरातील नागरिकांना या परिसरात शहरातील कचNयाची डम्पींग करण्यात येत असल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे यामुळे परिसरात साथरोग पसरण्याची भितीही व्यक्त होत आहे. गणेश नगर परिसरातील नागरिक व चिमुकल्या विद्याथ्र्यांच्या आरोग्याशी पालिका खेळ खेळत आहे. स्वच्छता अभियान फक्त फोटो पुरतेच राबविले जात असून प्रत्येक्षात मात्र, संपूर्ण शहर घाणीने माखले असल्याचा आरोप युवा स्वाभिमानने केला आहे. आश्वासनाला दोन महिने झाले, परंतु समस्या सुटली नाही. दरम्यान पुन्हा एकदा पालिका प्रशासनाला आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी युवा स्वाभिमानचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी कार्यालयात धडकले. मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले. पालिका प्रशासनाने डम्पींग यार्ड हटविले नाही तर युवा स्वाभिमान आपल्या स्टाईलने आंदोलन करून पालिकेच्या दारासमोर कचरा घालेल असा झणझणीत इशारा दिला. दरम्यान मुख्याधिकारी यांनी समस्या सोडविण्याची खात्री दिली. यावेळी युवा स्वाभिमनचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांच्यासह महासचिव वाय.पी.येळे, उपाध्यक्ष टोकेश हरिणखेडे, जगदीश रहांगडाले, अमित डोंगरे, गजेंद्र पटले, अरूण बनोठे, बबलू राणे, प्रदीप तिडके, जिवन शरणागत, अजय चौरागडे, राजेश हरिणखेडे, नागोराव बन्सोड, शुभम कटरे, महेंद्र वाघाडे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.