गोसेच्या नदीपात्रात बुडालेल्या युवकांचे मृतदेह आढऴले

0
5

पवनी(भंडारा),दि.07- भडांरा जिल्ह्यातील पवनी जवळून वाहणार्या वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द धरणावर सहलीसाठी आलेल्या ब्रम्हपुरी येथील दोघांचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली.मोहम्मद झायद अली (१३) व सोहेल बदानी (३५) असे मृतकांची नावे आहेत.बचावदलाने आज गुरुवारी सकाळी दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले.ब्रम्हपुरीहून सुमारे ३० जन कुटुंबासह गोसेखुर्द धरण पाहण्यासाठी आले होते.दरम्यान मोहम्मद अली हा धरणाच्या गेटजवळ असताना त्याच्या तोल गेल्याने पाण्यात पडला.झायदला वाचवण्यासाठी सोहेल बदानी यांनी नदीत उडी घेतली परंतु ते देखील खोल पाण्यात बुडाले.पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली मात्र संध्याकाळी अंधार झाल्याने दोघांनाही शोधणे शक्य नव्हते. आज सकाळी पोलिसांनी दोघांनाही शोधण्यासाठी मोहीम सुरु केली ज्यानंतर झायद व सोहेल यांचे मृतदेहच बचावदलाच्या हाती लागले.सोहेल व झायद यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकरुन कुटुंबियांना सोपविण्यात आले असून ब्रम्हपुरी येथे मात्र ईद च्या दिवशी अशी घटना घडल्याने शोककळा पसरली आहे.विशेष म्हणजे या घटनेची माहती मिळताच खासदार नाना पटोले यांनी रात्रभर प्रशासनाच्या संपर्कात राहून मृतदेह रात्रीच कसे काढता येईल यासाठी प्रयत्न केले होते,परंतु रात्रीला बचाव कार्य शक्य नसल्याचे उपविभागीय अधिकारी खिल्लारी यांनी स्पष्ट केल्यानंतर तसचे पहाटे पाच वाजता सुरु करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही खा.पटोले हे युवा कार्यकर्ते राजेद्र फुलंबाधे ,हरिष तलमले व हसांताई खोब्रागडे यांच्या सपर्कात राहून होते.फुलबांधे यांना पहाटे 4 वाजताच फोन करुन पाच वाजता कारवाई सुरु होणार असल्याने तु लवकर जा आणि तिथून सर्व माहिती दे असे फोन करुन म्हटले यावरुन खा.पटोले हे या घटनेप्रती किती संवेदनशिल होते अशी चर्चा परिसरात आहे.