सुटीच्या दिवशी उपाध्यक्षांचे वाहन धावते २०० किमी

0
7

गोंदिया,दि.15- गेल्यावर्षी १५ जुलैला झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूकीनंतर पदाधिकारी म्हणून उपाध्यक्ष रचना गहाणे यांना शासकीय वाहन उपलब्ध करुन देण्यात आले.या वाहनाच्या दुरुपयोगकरीत इंधनावर मात्र वर्षभरात उपाध्यक्षांनी अवाढव्य खर्च केल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केला आहे.या संबधीची माहिती परशुरामकर यांनी माहिती अधिकार कायद्यातर्गंत गाेळा केली आहे.
१५ जुलै २०१५ ते ३१ मार्च २०१५ पर्यंत जिल्हा परिषदेच्या ३३ सभा आयोजित करण्यात आल्या. या सर्व सभांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष उपस्थित आहेत. पण सभेच्या दिवशी सुद्धा उपाध्यक्षांचे वाहन २०० कि.मी.पेक्षा जास्त फिरल्याचे दाखविण्यात आले. हा वाहन भत्त्याचा दुरूपयोगच असल्याचा आरोप परशुरामकर यांनी केला. एवढेच नाही तर या काळामध्ये आलेल्या सुटीच्या दिवशीसुद्धा वाहनाचा सुमारे २०० कि.मी.चा प्रवास दाखविण्यात आलेला आहे. यामध्ये उपाध्यक्षांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप परशुरामकर यांनी केला.तसेच सीईओ यांना याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.