तेढाच्या उपसरपंचपदी मेंढे यांची वर्णी

0
7

गोरेगाव- तालुक्याच्या तेढा येथील उपसरपंचावर अविश्‍वास प्रस्ताव पारीत करून नविन उपसरपंच म्हणून डॉ. विवेक मेंढे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी सरपंच रत्नकला भेंडारकर, ग्रा.पं.सदस्य छन्नू काटेवार, उमेश शहारे, हेमराज उईके, वत्सला राऊत, कविता नाईक, लता भोयर, सिंधु भोयर, जि.प.सदस्य ज्योती वालदे, माजी सरपंच सावलराम ताराम, माजी सरपंच रमेश ताराम, उपसरपंच टेकचंद सांगुळकर, भास्कर भोयर, मनोज बाहे उपस्थित होते. सुशिक्षीत तरूणाचे उपसरपंचपदी निवड झाल्यामुळे याचा लाभ गावकर्‍यांना मिळणार आहे