साकोलीत विदर्भ राज्य आघाडीचे सदस्यत्व अभियान

0
45

साकोली,दि.20-विदर्भ राज्य आघाडी व यश क्लिनिकल लेबोरेटरी साकोली तर्फे संत विदेही मोतीराम बाबा आश्रम सावरबंध येथे रक्तशर्करा तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
महाराष्ट्राचे माजी महाधीवाक्ता श्रीहरी अणे यांच्या विदर्भ राज्य आघाडी व यश क्लिनिकल लेबोरेटरी साकोलीच्यावतीने गुरुपौर्णिमा निमित्त संत विदेही मोतीराम बाबा आश्रम सावरबंध येथे रक्तशर्करा तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. तसेच“आता विदर्भासाठी अंताचा लढा” असा नारा देणारे महाराष्ट्राचे माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे साहेबांच्या वेगळ्या विदर्भासाठी सुरु असणाऱ्या लढ्याला प्रतिसाद देवून राकेश भास्कर यांच्या नेतृत्वात साकोली येथे विदर्भ राज्य आघाडी ची स्थापना करण्यात आली. राकेश भास्कर यांचे खांद्याला खांदा देवून प्रवीण भांडारकर, चंद्रकांत वडीचार, दीपक जांभूळकर व शब्बीर पठाण यांनी आजपर्यत खेडोपाडी जावून सभा घेतल्या. ह्या नुक्कड सभेत आम्हाला वेगळा विदर्भ का?, अखंड महाराष्ट्रात विदर्भावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी अगदी तळागाळातील शेतकऱ्यांनी प्रयत्न करायला हवे. त्यासाठी संघटन निर्मिती आणि सभासद नोंदणी करणे महत्वाचे आहे.
साकोली तालुक्यातील सावरबंध येथील संत विदेही मोतीराम बाबा आश्रम येथे गुरुपौर्णिमेनिमित्त काल्याचे आयोजन केले होते. संत विदेही मोतीराम बाबा आश्रम हे विदर्भातील छोटे पंढरपूर म्हंटले जाते. गुरुपौर्णिमेनिमित्त येथे हजारो भक्त दर्शनाला येत असतात. ह्या संधीचा फायदा घेवून आश्रमात कॅम्प आयोजित करून विदर्भ राज्य आघाडी साकोली तर्फे सदस्यत्व नोंदणी अभियान राबविण्यात आले होते. ह्या कॅम्प मध्ये एकूण २२ लोकांनी विषय समजून घेवून स्वेच्छेने विदर्भ राज्य आघाडीचे सदस्यत्व स्वीकारले.आयोजनाकरीता दीपक जांभूळकर आणि शब्बीर पठान यांनी विशेष प्रयत्न केले.राकेश भास्कर, चंद्रकांत वाडीचार, प्रवीण भांडारकर व इतर उपस्थित होते.