मलेरियाने पहाडीटोल्यातील युवतीचा मृत्यू

0
13

गावात तापाची साथ : आरोग्य शिबिर लागले
गोंदिाय, दि. २३ : गेल्या चार दिवसांपासून तापाने फणफणत असलेल्या पहाडीटोला येथील युवतीचा अखेर काल, शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. पुस्तकला मुरारी पुसाम (वय २२) असे मृत युवतीचे नाव आहे. रक्तचाचणीदरम्यान, तिचा मृत्यू मलेरियाने झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. तथापि, गावात तापाची साथ पसरली असल्याचे माहित होताच आरोग्य केंद्रातर्फे पहाडीटोला व लगतच्या देवाटोला या गावात आरोग्य शिबिर लावण्यात आले. पहाडीटोला येथील पुस्तकला पुसाम हिचा मलेरियाने मृत्यू झाला. गावात भितीचे वातावरण निर्माण झाले. असे असतानाही मुल्ला प्राथ‘िक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लांडगे (गायकवाड) यांनी गावात जाऊन पाहणी करण्याचे सौजन्य दाखविले नाही. उलट या घटनेसदंर्भात टोलवाटोलवीचे उत्तर दिले. त्यामुळे गावकèयांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
देवरी तालुक्यातील पहाडीटोला हे गाव देवाटोला ग्रामपंचायतीअंतर्गत येते. मात्र, या गावात पावसाळ्यापूर्वीच्या कोणत्याही उपायोजना करण्यात आल्या नाहीत. सगळीकडे दुर्गंधीयुक्त वातावरण तयार झाले आहे. पाणी वाहून नेणाèया नाल्या केरकचèयाने तुडूंब भरल्या आहेत. नाल्यांत डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. हे डास घराघरात शिरून चावा घेत आहेत. मात्र, डास प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्याचे सौजन्य ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागानेही दाखविले नाही. याचाच परिपाक म्हणून गावात गत आठवडाभरापासून तापाची साथ परसली. पुस्तकला पुसाम हिला चार दिवसांपूर्वी तापाने घेरले. त्यामुळे तिच्यावर प्रथम साखरीटोला येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिला शुक्रवारी दुपारी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथून तिला गोंदियाला रेफर करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार गोंदियाला नेत असताना वाटेत गोरठा गावाजवळ तिचा सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. ही वार्ता गावात वाèयासारखी पसरली. गावात भितीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पंचायत समिती सदस्या सुनंदा बहेकार यांनी आरोग्य विभागाला संपर्क साधून गावात शिबिर लावण्याची मागणी केली. त्यानुसार, मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. ताराम, डॉ. येरणे व चमू गावात दाखल झाली. शिबिर लावून गावकèयांच्या आरोग्याची तपासणी केली. या तपासणीत सात ते आठ जणांना ताप असल्याचे उघड झाले. त्यांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. आरोग्य विभागाची चमू सध्या पहाडीटोला व लगतच्या देवाटोला या गावातही शिबिर लावून आहे.