श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित

0
12

गोंदिया- श्रमिक पत्रकार संघ गोंदिया र.न. महा.289-12 च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतीथीचे औचित्य साधून 15 आॅगस्ट रोजी टिळक गौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्काराकरीता जिल्ह्यातील संपादक, पत्रकार, स्तंभलेखक, छायाचित्रकार, वृत्तवाहिनी पत्रकारांकडून पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित करण्यात येत आहे. इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका 9 आॅगस्ट पर्यंत कार्यक्रमाचे संयोजक चंद्रकुमार बाहेकार यांचेकडे तसेच सावन डोये जिल्हा प्रतिनिधी ‘सकाळ’ कार्यालय,बाजपेई डायविंगच्या च्या जवळ सिव्हिल लाईन गोंदिया , प्रा. एच.एच.पारधी संपादक दै. लोकजन कार्यालय टि.बी.टोली गोंदिया , ओमप्रकाष सपाटे जि.प्र.भंडारा पत्रिका कार्यालय इंगळे चैक सिव्हिल लाईन गोंदिया येथे जमा करण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अल्ताफ शेख, सचिव संजय राउत, मार्गदर्शक खेमेंद्र कटरे यांनी केले आहे. यावर्षीच्या श्रमीक पत्रकार संघाच्या टिळक गौरव पुरस्कार वरिष्ठ पत्रकार गोंदिया बाजार चे संपादक भगत ठकरानी यांना जाहिर करण्यात आला आहे. त्यांना दिर्घकाळ पत्रकारीता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी गौरविण्यात येणार आहे. इतर स्मृती स्व.मनोहरभाई पटेल संपादकीय पुरस्कार, स्वातंत्रय सैनिक स्व. हिरालाल जैन उत्कृष्ठ विकासवार्ता पुरस्कार, स्व. संतोष अग्रवाल स्मृती शोधवार्ता पुरस्कार, श्रमीक पत्रकार संघ उत्कृष्ट छायाचित्रण पुरस्कार आदी पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रीत करण्यात येत आहे. या प्रवेशिका 9 आॅगस्टपर्यंत संयोजक चंद्रकुमार बाहेकार यांचेकडे तसेच सावन डोये जिल्हा प्रतिनिधी ‘सकाळ’ कार्यालय,बाजपेई डायविंगच्या च्या जवळ सिव्हिल लाईन गोंदिया , प्रा. एच.एच.पारधी संपादक दै. लोकजन कार्यालय टि.बी.टोली गोंदिया , ओमप्रकाष सपाटे जिल्हा प्रतिनिधी ‘भंडारा पत्रिका ’ कार्यालय इंगळे चैक सिव्हिल लाईन गोंदिया यांच्याकडे जमा करता येतील. पुरस्कारासाठी 1 मे 2015 ते 1 जून 2016 या दरम्यान प्रकाशित बातम्या, लेख संपादकीय ग्राह्य धरले जातील प्रवेशिका दोन प्रतीमध्ये, मुळ कात्रण व स्पर्धकांच्या छायाचित्रासह देणे आवश्यक आहे. मुदतीनंतर आलेल्या प्रवेशिकावर विचार करण्यात येणार नाही अशी माहिती श्रमिक पत्रकार संघाचे सचिव संजय राउत यांनी दिली आहे.