डोंगरगाव येथील पो.पा. निलंबित

0
14

तिरोडा,दि.28- तालुक्यातील डोंगरगाव येथील पोलिस पाटील अरेरावी करतो तसेच वैद्यकिय व्यवसाय करतो, अशा अनेक तक्रारींची दखल घेत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोनि. यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबित झालेल्या पोलिस पाटिलाचे नाव मुन्ना फागुजी रहांगडाले असे आहे. काही वर्षापूर्वी डोंगरगाव येथील पोलिस पाटिल या पदावर मुन्ना रहांगडाले यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र वाढत्या तक्रारींमुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांनी दिली आहे.