‘उज्ज्वला‘ गॅसच्या यादीला भाजप आमदारांची मंजुरी

0
6

माजी आमदार दिलीप बनसोड यांचा आरोप : राष्ट्रवादी काँग्रेस करणार आंदोलन

गोंदिया,दि.28, – केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस कनेक्शन योजना सुरू केली. मात्र, त्यासंदर्भातील निकष अद्याप ठरलेले नाहीत. असे असताना तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यातील गावांत प्रशासकीय मंजूरी नसलेल्या याद्या त्या-त्या गावांतील भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. त्या याद्यांतील नावांवर आमदारांनी शिक्कामोर्तब केले. त्या नावांत भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे ही योजना शासनाची, की भाजपची असा आरोप माजी आमदार दिलीप बनसोड यांनी केला. तत्काळ त्या याद्यांवर अंकूश लावून सुधारित याद्या प्रकाशित कराव्या. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतफेर् तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकार परिषदेत त्यांनी दिला.यावेळी पत्रपरिषदेला जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे, सुरेश हर्षे, डुमेश चौरागडे, कृष्णा भांडारकर उपस्थित होते.
येथील शासकीय विश्रामगृहात आज, गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. आमदार बनसोड म्हणाले, जेव्हा पासून केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आली, तेव्हापासून पक्षपातीपणाचा कारभार सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीपीएल निकषात बसणाèया महिलांकरिता उज्ज्वला गॅस कनेक्शन योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभाथ्र्यांची निवड कशी करायची, याचे निकष अद्याप तालुका आणि जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले नाही. मात्र, गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यातील गॅस एजन्सी धारकांकडे काही याद्या त्यांच्या मुख्य कार्यालयाकडून प्राप्त झाल्या. त्या याद्या एजन्सीधारक त्या क्षेत्रातील आमदारांना देतात. आमदार त्या याद्यांवर गावनिहाय जबाबदारी आपल्या कार्यकत्र्याकडे सोपवितात. या याद्यांत कित्येक मृत्यू झालेल्या आणि गावात कधी अस्तीत्वात नसलेल्यांच्याही नावांचा समावेश आहे. एपीएल आणि बीपीएल हे निकष देखील लावण्यात आलेले नाहीत. गावांत वाद सुरू झाले. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ही योजना फक्त भाजपला मतदान करणाèयांकरिताच असली, तर ज्यांनी भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांना मतदान केले त्यांना देश सोडून जावे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर चौकशी करून सध्या अस्तित्वात असलेल्या याद्या रद्द कराव्या. नव्याने सर्वेक्षण करून मंजूर याद्या ग्रामपंचायतीत ठेवण्यात याव्या. अन्यथा येत्या आठ दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यात तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिलीप बनसोड यांनी दिला.