उभ्या पिकावर जेसीबी चालवून पाईपलाईनचे काम

0
15

उद्दीष्टपूर्तीसाठी उभ्या पिकात जेसीबी
धापेवाडा उपसा सिंचनचा प्रताप : १५ ऑगस्टला पाणी सोडण्याचा खटाटोप
कंत्राटदार कंपनी श्रीनिवासनच्या कर्मचार्याच्या दादागिरीला डेप्युटी ईई शरणागतचा पाठिंबा

गोंदिया,(berartimes.com)दि. २९ : धापेवाडा उपसा सिंचन योजना प्रकल्पातून खैरबंदा तलावात पाणी सोडण्याकरिता ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. यातील १५ कोटी रुपयांची थकीत रक्कम देतांनाच मंत्रालयाने 15 आॅगस्टपर्यंत काम पुर्ण करुन पाणी सोडण्याचे उदिष्ठ ठरवून दिले.त्या उदिष्ठामुळे धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या कार्यकारी अभियंता विभागाने एैन खरीप हंगामात शेतातील पिकाची नासाडी करीत पाईपलाईन घालण्याचे काम सोमवारपासून सुरु केले आहे.मजीतपूर पासून 20 किलोमीटरपर्यंत ही पाईपलाईन घालण्यात येणार आहे.पाईप घालण्याआधी कुठलीही लेखी सुचना रस्त्याकाठावरील शेतकर्याला न देता श्रिनीवासन या खासगी कंत्राटदाराने कामाला सुरवात केल्याचे चित्र बघावयास मिळाले.तर विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या १५ ऑगस्ट रोजी पाणी सोडण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याकरिता काम युद्धस्तरावर सुरू आहे. काम करण्याच्या खटाटोपात विभागाने मजीतपूर नजीक चक्क शेतकèयांच्या शेतातील उभ्या पिकात जेसीबी टाकून पीक उद्धस्त केले. त्यामुळे शेतकèयांत प्रशासनाप्रती रोष व्यक्त करण्यात येत आहे.
धापेवाडा प्रकल्पातून खरबंदा तलावात पाणी लिफ्टच्या माध्यमातून पाणी टाकण्यात येत आहे. त्याकरिता २० किलोमिटरच्या अंदाजपत्रकाला मंजूरी देण्यात आली. त्याकरिता निधी सुद्धा आला. त्या निधीतून पाण्याची टाकी आणि पाईप टाकण्यात आले. मात्र, पुन्हा एक किलोमिटर लांबी वाढल्यामुळे सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. शासनाने संपूर्ण कामाकरिता ५५ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी प्रदान केली. दुसèया टप्प्यातील निधी धडकला असून तो निधी तातडीने खर्च करून खरबंदा तलावात १५ ऑगस्टपासून पाणी सोडण्यात यावा, असा फतवा शासनाने धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या नावे पाठविला. या कामाचे कंत्राट आंध्रप्रदेशातील श्रीनिवासा कंपनीला देण्यात आले. कंपनीने रस्त्याशेजारी असलेल्या आणि ज्या ठिकाणाहून पाईप जाणार आहेत, तेथील शेतकèयांना कसलीही लेखी सूचना न देता पावसाळ्यात पाईप टाकणे सुरू केले. शेतकèयांनी पंधरा दिवसांपूर्वी रोवणी केली. धानाची रोपटी जे‘ते‘ उभी होत असतानाच कंत्राटदाराच्या जेसीबीने उध्वस्त केले. यात शेतकèयांचे ‘ोठे नुकसान झाले. एवढेच नव्हे, तर उभ्या पिकात माती देखील टाकली. यामुळे शेतकèयांत धापेवाडा उपसा सिचन योजना आणि कंत्राटदाराविरोधात प्रचंड रोष आहे. या प्रकाराची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे काग्रेस पक्षाचे गटनेते रमेश अंबुले यांनी घटनास्थळावर धाव घेत उपविभागीय अभियंता आणि कंत्राटदाच्या व्यवस्थापकाची कानउघाडणी करत शेतकèयाला नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरली. माजी आ‘दार दिलीप बनसोड यांनी देखील हा प्रकार गैर असून पावसाळ्यात पाईप टाकल्यामुळे अतिवृष्टी झाल्यास आणि पाइप मधील पाण्याचा दाब वाढल्यास लिकेजचे प्रमाण वाढणार असल्याची चिंता व्यक्त केली. उन्हाळ्यात सुस्त असलेल्या यंत्रणेला पावसाळ्यात उद्दीष्टपूर्तीची गरज का भासली? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे, का‘ सुरू असलेल्या ठिकाणी विभागाचा अभियंता कामावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परंतु, त्याठिकाणी बागडे नावाच्या वर्ग चारच्या कर्म‘चाèयाची नियुक्ती करण्यात आली.शासकीय काम करीत असताना कुणालाही विचारण्याची गरज नाही वाटले तर आम्ही शेताच्या मधोमध भागातूनही जेसीबी चालवू शकतो अशी भूमिका कंत्राटदाराचे कर्मचारी व अभियंते करताच शेतकरी ठाकरे व जि.प.सदस्य अंबुले यांनी उपोषणाचा ईशारा दिला.उपोषणाचा इशारा देताच कायद्याचे धाक दाखविणारे अधिकारी मवाळ होत आम्ही भरपाई देण्याचा प्रयत्न करु असे बोलू लागले आहेत.

रस्त्याच्या बाजूला १२ मिटर जागा बांधकाम विभागाची आहे. कंत्राटदाराने शासकीय जागेत पाईप टाकले. त्यामुळे पीक उध्वस्त होण्याचा प्रश्न उद्धवत नाही. त्यांनी सरकारी जागेत धान लावले, त्यामुळे त्यांना नोटीस देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शेतकèयांच्या नुकसानाशी आमचे काही देणेघेणे नाही.तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करु शकता शासकीय काम असून आमच्याकडे सर्व परवानग्या आहेत.
श्री. शरणागत
उपविभागीय अभियंता,धापेवाडा उपसा सिंचन योजना तिरोडा